U19 World Cup : जैस्वालची फिफ्टी; मोठ्या धावसंख्येच्या दिशेने टीम इंडियाची वाटचाल!

टीम ई-सकाळ
Sunday, 9 February 2020

अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने आपला दबदबा कायम राखला आहे. आतापर्यंत झालेल्या 13 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने सर्वाधिक 4 वेळा विजेतेपदावर नाव कोरले आहे.

INDvsBAN : पोचेस्ट्रूम : 19 वर्षांखालील गजविजेता भारतीय संघ विश्वकरंडक स्पर्धेचं विजेतेपद पाचव्यांदा जिंकण्यासाठी उत्सुक आहे. शेजारील देश असलेल्या बांगलादेशच्या टीमसोबत टीम इंडिया दोन हात करत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय बांगलादेशचा कॅप्टन अकबर अलीने घेतला. त्याचा हा निर्णय बांगलादेशी बॉलरनी सार्थ ठरवल्याचे चित्र सध्या दिसत आहे. भारताच्या डावाची सुुरवात अडखळत झाली. सलामीवीर दिव्यांश सक्सेना लवकर माघारी परतला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या तिलक वर्मा आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने भारताच्या डावाला आकार दिला. 

- INDvsNZ : जिंकता जिंकता हरला; पण जडेजाने कपिल देव अन् धोनीचा 'तो' विक्रम मोडला!

बॉलिंग आणि फिल्डींगमध्येही बांगलाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी बजावली. त्यामुळे टीम इंडियाच्या युवा क्रिकेटपटूंना धावा काढण्यास जास्त संधी मिळाल्या नाहीत. तरीही डावखुऱ्या यशस्वी जैस्वालने आपल्या शैलीला साजेशी खेळी करत अर्धशतक झळकावले. त्याला तिलकनेही चांगली साथ दिली. मात्र, तो मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. 

- INDvsAUS : 'कॅप्टन क्वीन'ची कमाल; 'या' विक्रमाशी साधली बरोबरी!

त्यानंतर टीम इंडिया अंडर-19 चा कॅप्टन प्रीयम गर्ग मैदानात उतरला. पण त्याने चाहत्यांना निराश केले. केवळ 7 धावांवर रकिबूल हसनच्या बॉलिंगवर गर्गने तंझीम सकीबकडे सोपा कॅच दिला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या 35 ओव्हरमध्ये 3 आऊट 128 रन्स झाल्या होत्या. 

फायनलसाठी टीम इंडियात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. मात्र, बांगलादेशने हसन मुरादच्या जागी अविषेक दासला संधी दिली आहे. 

- TOM2020 : कर्करोगावर मात करत 'तो' खेळाडूंचा दिवस बनवतोय 'कलरफूल'!

दरम्यान, अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने आपला दबदबा कायम राखला आहे. आतापर्यंत झालेल्या 13 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने सर्वाधिक 4 वेळा विजेतेपदावर नाव कोरले आहे. दोनवेळा उपविजेतेपदा तर दोन वेळा तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: U19 World Cup Relentless Bangladesh strike but Yashasvi Jaiswal drives India