esakal | IPL CountDown : रेकॉर्ड, किस्से आणि बरंच काही! एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2020 , Dream11

IPL CountDown : रेकॉर्ड, किस्से आणि बरंच काही! एका क्लिकवर

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील स्पर्धा युएईच्या मैदानात रंगणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटला ब्रेक लागल्यानंतर भारतीय खेळाडूंसाठी ही पहिली स्पर्धा असेल. आयपीएल स्पर्धा ही राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा मापदंड नसली तरी युवा खेळाडूंसाठी निवड समितीचे लक्ष वेधण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण मानली जाते. यंदाच्या स्पर्धेत युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे खास लक्ष असेल. बिनधास्त अंदाजात खेळणारे युवा फलंदाज या हंगामात धावांची बरसात करुन लक्षवेधी खेळी करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील. वाचा कोणते युवा खेळाडू शतकी खेळी करण्याची धमक दाखव शकतात. 

IPL 2020 : या तीन युवा फलंदाजांमध्ये शतकी खेळी करण्याची धमक

विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून तीन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तो नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना पाहायला मिळते. दुसऱ्या फोटोत तो संघातील सहकाऱ्यांसोबत फूटबॉल खेळताना दिसते. तर तिसऱ्या फोटोत तो बाथटबमध्ये आंघोळ करतानाचे चित्र पाहायला मिळते.

  IPL 2020 : कोहली सरावानंतर असा दूर करतो थकवा; पाहा खास फोटो 

यंदाच्या वर्षातील संभ्रम अवस्थेत असलेली भारतीय क्रिकेटच्या मैदानातील लोकप्रिय स्पर्धेच्या तेराव्या हंगामातील सामने युएईत रंगणार आहेत. कोरोनाजन्य परिस्थितीमुळे निवडलेला 'पर्यायी प्रयोग' कितपत यशस्वी ठरणार यासाठी आपल्याला दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागेल. तूर्तास आगामी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर #IPLचा मागोवा.. या लेख मालिकेतून आयपीएलच्या पर्वापासून ते गतवर्षीपर्यंतच्या स्पर्धेपर्यंतचा आढावा घेत आपण त्या-त्या हंगामातील खास आणि लक्षवेधी ठरलेल्या घटनांना उजाळा देणार आहोत.

#IPLचा मागोवा : देशी 'थप्पड' अन् परदेशी खेळाडूंनी गाजली होती स्पर्धा