IPL 2020 TimeTable : सलामीचा सामना ठरल्याप्रमाणेच; धोनी-रोहित नाणेफेकीनं होणार शुभारंभ

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 6 September 2020

स्पर्धेचा शुभारंभ आबूधाबीच्या मैदानातून मुंबई इडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने होईल.

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) युएईमध्ये रंगणाऱ्या  आयपीएलच्या 13 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ही स्पर्धा युएईच्या तीन मैदानात खेळवण्यात येणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. 19 सप्टेंबरपासून रंगणाऱ्या स्पर्धेचा अंतिम सामना  10 नोव्हेंबरला खेळवण्यात येण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता स्पर्धेसाठी काही दिवस शिल्लक असताना कोणता सामना कधी खेळवण्यात येणार याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेचा शुभारंभ आबूधाबीच्या मैदानातून मुंबई इडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने होईल. आयपीएलमधील परंपरेनुसार मागील वर्षातील गतविजेता आणि उप-विजेता यांच्यातील लढतीने स्पर्धेला सुरुवात होईल.

आयपीएलच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

आयपीएलमधील 24 साने दुबई, 20 सामने आबूधाबी आणि 12 सामने शाहजाहच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. सध्याच्या घडीला केवळ साखळी सामन्यातील वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. साखळी सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात  प्लेऑफच्या सामन्याचे वेळापत्रक जाहीर करणे अपेक्षित आहे. 3 नोव्हेंबर रोजी आयपीएलमधील अखेरचा साखळी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगेल.  

ImageImage 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UAE iplt20 schedule 2020 bcci announces time table Mumbai Indians vs Channai Super Kings Opening Match