उल्हासनगरच्या कन्येची रायफल शूटिंगमध्ये गोल्डमेडलची हॅटट्रिक

उल्हासनगरच्या कन्येची रायफल शूटिंगमध्ये गोल्डमेडलची हॅटट्रिक
Summary

दहावीच्या मुलीची तिन्ही गटात बाजी

उल्हासनगर: नवी-मुंबई (वाशी) येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य एअर रायफल शूटिंग स्पर्धेत उल्हासनगर महानगरपालिकेतील लेखाधिकारी सूर्यकांत खटके यांची इयत्ता दहावीत शिकणारी त्वरिता खटके या मुलीने सुवर्णझेप घेतली आहे. त्वरिताने मुलींच्या तिन्ही गटात ३ गोल्डमेडलची हॅटट्रिक मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला.

उल्हासनगरच्या कन्येची रायफल शूटिंगमध्ये गोल्डमेडलची हॅटट्रिक
VIDEO : सामना फिरवणारी कार्तिक त्यागीची खतरनाक 'डेथ ओव्हर' बघाच

त्वरिता ने मुंबई- पुणे- कोल्हापूर- सातारा- सांगली- नासिक- नागपूर च्या स्पर्धकांना मागे टाकत ४०० पैकी ३८४ गुण मिळवून हे घवघवत यश प्राप्त केले आहे.त्वरिता ही सोलापूर मधील नामांकित आयएमएस या शाळेत इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे.तिने शाळेच्या संचालिका सायली जोशी,रायफल शूटिंगचे कोच अविनाश गोसावी यांच्या योग्य सुनियोजित मार्गदर्शनाखाली शुटिंगचे धडे गिरवले आहेत.सूर्यकांत खटके यांची उल्हासनगर महानगरपालिकेच्या लेखाधिकारी पदावर नियुक्ती झाल्यावर त्वरिताची आई निलम खटके यांनी शिक्षिकेचा जॉब करून त्वरिताला इयत्ता आठवी पासून आयएमएस मॉडेल शूटिंग अकॅडमी वर ने-आण करण्याची,शाळेचा अभ्यास घेण्याची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी तारेवरची कसरत करताना त्वरिताला स्पोर्ट मध्ये पुढे आणण्याचे प्रेरणा देण्याचे कर्तव्य बजावले.

उल्हासनगरच्या कन्येची रायफल शूटिंगमध्ये गोल्डमेडलची हॅटट्रिक
IPL 2021: 'मॅचविनर' कार्तिक त्यागीवर बुमराह, स्टेनही झाले फिदा

लेखाधिकारी सूर्यकांत खटके यांनी त्यांची मुलगी त्वरिता हिला तिच्या या ऐतिहासिक कामगिरीची शाबासकी देतानाच पत्नी निलम यांचेही फेसबुक वर केलेल्या पोस्टमध्ये आभार मानले आहेत. मुलींच्या तिन्ही गटात सुवर्ण पदकांची हॅटट्रिक मारणाऱ्या त्वरिता हिची अहमदाबाद गुजरात येथे 10 ते 16 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या नॅशनल एअर रायफल शूटिंग ट्रायल्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com