WTC Final 2023 : अखेर बीसीसीआयला उमेश यादव अन् शार्दुल ठाकूरने दिला दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WTC Final 2023 Umesh Yadav Shardul Thakur

WTC Final 2023 : अखेर बीसीसीआयला उमेश यादव अन् शार्दुल ठाकूरने दिला दिलासा

WTC Final 2023 Umesh Yadav Shardul Thakur : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 7 जूनपासून केनिंगटन ओव्हलवर WTC Final ची फायनल सुरू होणार आहे. यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा देखील केली आहे. मात्र आयपीएल सुरू असल्याने सर्व खेळाडूंच्या दुखापतींचा सिलसिलाच सुरू झाला आहे. बीसीसीआयने फ्रेंचायजींसोबत खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट करून देखील एका पाठोपाठ एक खेळाडू दुखापग्रस्त होत असल्याने बीसीसीआयचे टेन्शन वाढले. मात्र आता बीसीसीआयला मोठा दिलासा मिळाला आहे.

भारताचे दोन वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर हे दुखापतीतून सावरले असून ते आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी उपलब्ध झाले आहेत. उमेश यादव हा आपल्या हॅमस्ट्रिंग दुखापतीतून सावरत असून त्याची दुखापत फारशी गंभीर नाहीये. बीसीसीआयची मेडिकल टीम केकेआरच्या मेडिकल टीम सोबत उमेशच्या दुखापतीवर काम करत आहे.

दुसरीकडे शार्दुल ठाकूरने त्याचा फिटनेस पुन्हा मिळवला असून तो आता WTC Final साठी उपलब्ध आहे. मात्र बीसीसीआयने जयदेव उनाडकटबाबत वेट अँड वॉचची भुमिका घेतली आहे. जर तो WTC Final ला मुकला तर त्याची रिप्लेसमेंट 23 मे रोजी घोषित करण्यात येईल. उनाडकटला खांद्याची दुखापत झाली आहे. तो आयपीएल 2023 च्या उर्वरित सामन्यांना मुकला आहे. WTC Final ला अजून एक महिना असल्याने त्याच्याकडे अजून फिट होण्यासाठी वेळ आहे.

याबाबत बोलताना बीसीसीआय अधिकारी म्हणाला की, 'शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव हे दोन महत्वाचे खेळाडू आहेत. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार ते व्यवस्थित आहेत. शार्दुल फिट आणि फाईन आहे. उमेश हा दुखापतीतून सावरत आहे. तो दोन आठवड्यात पूर्णपणे फिट होईल. जयदेवबाबत सध्या चिंता आहे. मात्र त्याच्याकडेही अजून वेळ आहे. त्यामुळे त्याची रिप्लेसमेंट घोषित करण्याची आम्ही घाई करणार नाहीये.'

(Sports Latest News)