Pro Kabaddi 2019 : मुंबई, पुण्याचे संघ एका माळेचे मणी; दोघांनीही चुका करून सामने गमावले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

मुंबई, पुणे या शेजारील दोन्ही संघांसाठी प्रो कबड्डीतील सोमवार फारच निराशाजनक ठरला. दोन्ही संघांच्या प्रमुख खेळाडूंनी सोप्या चुका केल्या, त्याची परिणती पराभवात झाली. जयपूर पिंक पॅंथर्सकडून यू-मुम्बा हरले; तर हरयाना स्टीलर्सने पुणेरी पलटणचा 34-24 असा पराभव झाला. 

प्रो कबड्डी 2019 : हैदराबाद : मुंबई, पुणे या शेजारील दोन्ही संघांसाठी प्रो कबड्डीतील सोमवार फारच निराशाजनक ठरला. दोन्ही संघांच्या प्रमुख खेळाडूंनी सोप्या चुका केल्या, त्याची परिणती पराभवात झाली. जयपूर पिंक पॅंथर्सकडून यू-मुम्बा हरले; तर हरयाना स्टीलर्सने पुणेरी पलटणचा 34-24 असा पराभव झाला. 

आजच्या पहिल्या समन्यात मुंबईची फझल अत्राचली आणि संदीप नरवाल या कोपरारक्षकांनी चुका केल्या; तर दुसऱ्या सामन्यात सुरजित आणि गिरीश इरनाक यांनी चुकीच्या पकडी केल्या. त्यातच पुण्याला नितीन तोमरची अनुपस्थिती चढाईत जाणवली. गतमोसमात अर्ध्याहून अधिक सामन्यांत तोमर खेळू शकला नाही. यंदाच्या मोसमात तो सलामीच्या सामन्यातही खेळू शकला नाही, त्यामुळे पुण्याचे आक्रमण दुबळे झाले. 

पुणे आणि हरियाना ही लढत भारताचे माजी कर्णधार अनुप कुमार आणि राकेश कुमार यांच्या प्रशिक्षणाची श्रीगणेशा करणारी होती, पण आज राकेश कुमारची सरशी झाली. पुण्याला पूर्वार्धात दोन लोणचा सामना करताना 10-22 अशा पिछाडीचा सामना करावा लागला होता. पूर्वार्धात सुरजितला एकही गुण मिळवता आला नव्हता; तर गिरीशच्या खात्यात एकाच गुणाची नोंद होती. हरयानाच्या नवीनने सुपर टेन (14 गुण) करण्याची कामगिरी बजावली. मनजितने अष्टपैलुत्व दाखवले; तर सेल्वामनीची एक सुपर रेड पूर्वार्धात मोलाची ठरली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UMumba and Puneri Patan team lost in Pro Kabaddi 2019