भारतीय फुटबॉल संघ विजेता 

वृत्तसंस्था
सोमवार, 14 मे 2018

भारताच्या 16 वर्षांखालील संघाने सर्बिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविले. भारताने अंतिम लढतीत ताजिकिस्तानचा 4-2 असा पराभव केला.
 

नवी दिल्ली - भारताच्या 16 वर्षांखालील संघाने सर्बिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविले. भारताने अंतिम लढतीत ताजिकिस्तानचा 4-2 असा पराभव केला.

सामन्याच्या सुरवातीच्या दहा मिनिटांतच तुफानी खेळ करत भारताने तीन गोल केले होते. "भारतीय खेळाडूंचे हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे; पण आमचे मुख्य उद्दिष्ट, 16 वर्षांखालील एएफसी स्पर्धेत खेळण्याचे आहे,' असे प्रशिक्षक बिबिआनो फर्नांडिस यांनी सांगितले. 

Web Title: Under 16 Indian football team wins title in Serbia