लोणावळा ते वेस्ट इंडीज; U19 India तील पठ्ठ्याचा संघर्षमयी प्रवास

U19 World Cup Vicky Ostwal
U19 World Cup Vicky OstwalSakal

U19 World Cup: वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात विक्की ओस्तवाल (Vicky Ostwal) नं सर्वांचे लक्ष्य वेधून घेतलंय. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सलामीच्या लढतीत त्याने भारतीय संघाच्या (Under 19 India Team) विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने प्रतिस्पर्ध्यांचा अर्धा संघ तंबूत धाडला. महाराष्ट्रातील लोणावळ्याच्या पठ्याचा इथपर्यंतचा प्रवास सहज आणि सोपा नव्हता. त्याचे कोच मोहन जाधव यांनी त्याच्या संघर्षमयी प्रवासाची कहाणी सांगितली आहे.

विकी हा लोणावळ्यात क्रिकेट (Cricket) खेळायचा. त्याच्यातील प्रतिभा ओळखून मोहन जाधव यांनी विकीच्या वडिलांशी चर्चा करुन पुण्याला स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला होता. मग त्याने मागे वळून पाहिलेच नाही. डाव्या हाताने गोलंदाजी करणारा फिरकीपटू आपल्यातील चुणूक दाखवून देत आहे. ज्या विकीनं (Vicky Ostwal) भारतीय संघाच्या विजयाची स्क्रीप्ट लिहिली त्यात त्याच्या आई वडिलांचाही मोठा वाटा असल्याचे मत प्रशिक्षक मोहन जाधव यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

U19 World Cup Vicky Ostwal
संधी मिळाली तर टेस्टचा कॅप्टन व्हायला आवडेल : बुमराह

लोणावळ्याच्या विकीनं वयाच्या नवव्या वर्षी मुंबईतील वेंगसरकर अकादमीतून खेळाला सुरुवात केली. दहाव्या वर्षी तो मुंबईहून थेरगावच्या वेंगसरकर अकादमीत जॉईन झाला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची कनेक्ट होण्यासाठी विकी लोणावळ्यावरुन पुण्यात स्थायिक झाला. विकीनं भारतीय अंडर-19 आशियाई कप स्पर्धा जिंकून देण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

U19 World Cup Vicky Ostwal
कर्णधारपद कोणाचा जन्मसिद्ध अधिकार नाही : गंभीर

सुरुवातीच्या काळात वडिलांसोबत त्याने (ओस्तवाल) तीन ते चार वर्षे लोकल ट्रेनने प्रवास केला. त्याच्या सरावात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी त्याच्या वडिलांनी शाळेतून त्याला लवकर घरी पाठवण्याची परवानगी घेण्याची कसरतही केली आहे. लोणावळा ते चिंचवड असा विकी प्रवास करायचा. यासाठी त्याला दिड तास वेळ जायचा. दिवसभराती तीन तास प्रवासात जायचे. प्रवासातील वेळ वाचवण्यासाठी ओस्तवाल कुटुंबिय पुण्यात स्थायिक झाले, अशी गोष्टही मोहन जाधव यांनी पीटीआयशी बोलताना सांगितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com