ICC T20 World Cup 2024 : नाव मोठं लक्षण खोटं! युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने ICC चं टेन्शन वाढवलं

ICC T20 World Cup 2024
ICC T20 World Cup 2024 esakal

ICC T20 World Cup 2024 : आयसीसीचा 2024 चा टी 20 वर्ल्डकप हा वेस्ट इंडीज आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका इथे होणार याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता हा वर्ल्डकप पूर्णपणे वेस्ट इंडीजमध्येच घेण्याबाबत आयसीसी विचार करण्याची शक्यता आहे. युएसएसारख्या मोठ्या देशात क्रिकेटचा प्रसार होण्याच्या दृष्टीकोणातून या वर्ल्डकपकडे पाहिले जात होते. मात्र युएसएमध्ये इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यातइतकी संसाधने नाहीयेत.

ICC T20 World Cup 2024
SRH vs KKR : रिंकू - राणा जोडीची झुंजार खेळी, हैदराबादच्या गोलंदाजांचीही सांघिक कामगिरी

युएसए क्रिकेटचे काळजीवाहू चेअरमन डॉक्टर अतुल राय यांना न्यूज 18 क्रिकेट नेक्स्टला दिलेल्या मुलाखताती सांगितले की युएसएमध्ये टी 20 वर्ल्डकपमधील सामने घेण्यासाठी पुरेशा सुविधा नाहीयेत त्यामुळे परिस्थिती खूप अवघड होत आहे. युएसए टी 20 वर्ल्डकप सारखी मोठी स्पर्धा आयोजित करण्यासाठीची किमान पातळी देखील गाठू शकत नाही. त्यामुळे वेस्ट इंडीजच 2024 चा संपूर्ण टी 20 वर्ल्डकप आयोजित करेल.

ICC T20 World Cup 2024
Rishabh Pant Instagram Story : ऋषभ पंतच्या फिटनेसचं प्रगतीपुस्तक; इन्स्टा स्टोरी ठेवत म्हणतो...

राय म्हणाले की, 'आम्ही टी 20 वर्ल्डकप आयोजित करण्याइतपत सोई सुविधा निर्माण करू अद्यापही शकलेलो नाही. मात्र याबाबत अंतिम निर्णय हा आयसीसीला घ्यायचा आहे. मात्र पुरेशा पायभूत सुविधांअभावी युएसएमध्ये काही होणार नाहीये. आता आमच्याकडे कोणत्याही पायभूत सुविधा नाहीयेत आता आयसीसीवरच सर्व अवलंबून आहे. ते इथे काही व्हेन्यू तयार करण्यासाठी गुंतवणूक करते का हे पहावे लागले. खरं सांगायचं तर मात्र परिस्थिती खूप कठिण आहे. आयसीसीला देखील याची कल्पना आहे.'

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com