IPL 2020 : BCCI घेणार मोठा निर्णय; अमेरिकेत खेळणार आयपीएलचे संघ

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

आयपीएलच्या नव्या मोसमाबद्दल सर्वांना आतापासूनच उत्सुकता लागली आहे. यंदाच्या आयपीएलबाबत बीसीसीआय मोठा निर्णय घेणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी आयपीएलमधील संघ अमेरिकेत मैत्रीपूर्ण लढती खेळण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : आयपीएलच्या नव्या मोसमाबद्दल सर्वांना आतापासूनच उत्सुकता लागली आहे. यंदाच्या आयपीएलबाबत बीसीसीआय मोठा निर्णय घेणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी आयपीएलमधील संघ अमेरिकेत मैत्रीपूर्ण लढती खेळण्याची शक्यता आहे. 

शेतकऱ्याचंच पोर ते, मातीशी जोडून राहणारच!

विदेशात खेळणार सराव सामने :
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स, कोलकता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी बीसीसीआयकडे विदेशात मैत्रीपूर्ण सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या कल्पनेशी दिल्ली कॅपिटल्सही सहमत आहे. अशात एखादी विदेशी फ्रॅंचाईजी जर संघातसोबत खेळली तर याने स्पर्धेसही फायदाही होईल. 

Image result for usa cricket stadium

मुंबई इंडियन्सने दिली कल्पना :
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कल्पना मुंबई इंडियन्सने सुचविली आहे. मुंबईच्या संघाची अशी इच्छा आहे की आयपीएलचे मैत्रीपूर्ण सामने अमेरिकेत व्हावे. अमेरिकेत यापूर्वी काही ट्वेंटी20 सामने खेळविले गेले आहेत ज्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच अमेरिकेत भारतीय वंशाचे खूप नागरिक असल्याने या सामन्यांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. 

Image result for mumbai indians

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: USA to host friendly matches of IPL 2020