उसेन बोल्ट, सिमोनी बिलेस सर्वोत्कृष्ट खेळाडू 

Usain Bolt
Usain Bolt

मोनॅको : क्रीडा विश्‍वातील महान धावपटू उसेन बोल्ट आणि जिम्नॅस्ट सिमोनी बिल्स यांची प्रतिष्ठेच्या लॉरेस जागतिक पुरस्कारात वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. 

खेळामधील 'ऑस्कर' म्हणून या पुरस्कारांची ओळख आहे. बोल्टने विक्रमी चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला. यापूर्वी बोल्ट 2009, 10 आणि 13 मध्ये या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. टेनिसपटू रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स, साहसी क्रीडापटू केली स्लॅटर यांनीही हा पुरस्कार यापूर्वी चार वेळा पटकावला आहे. बोल्टला सर्वकालिक सर्वोत्तम धावपटू मायकेल जॉन्सनच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

बोल्टप्रमाणेच ऑलिंपिकमध्ये जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करणारी सिमोनी बिलेस महिला विभागात सर्वोत्तम खेळाडू ठरली. रियो ऑलिंपिकमध्ये तिने चार सुवर्ण आणि एक ब्रॉंझ अशी एकूण पाच पदके मिळविली. 

ऑलिंपिकमधील सर्वकालिन सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या जलतरणपटू मायकेल फेल्प्सला जोरदार पुनरागमन करणारा खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. पुनरागमनाच्या स्पर्धेत त्याने पाच सुवर्णपदकांची कमाई केली. 'फॉर्म्युला वन' मधील जगज्जेता निको रॉसबर्ग यालदेखील 'ब्रेक थ्रू ऑफ दि इयर' पुरस्काराने गौरविण्यात आले. यापूर्वी 2014 आणि 2015 मध्ये उपविजेता राहिल्यानंतर गेल्यावर्षी रॉसबर्गने प्रथमच विजेतेपदाला गवसणी घातली होती. 

अन्य पुरस्कार 
बीआट्रिस व्हिओ : अपंग खेळाडू 
ऑलिंपिक रिफ्युजी टीम : प्रेरणा पुरस्कार 
वेव्हज फॉर चेंज : सर्वोत्कृष्ट क्रीडा कार्यक्रम 
रचेल ऑथर्टन : ऍक्‍शन स्पोर्टसमन 
लिस्टर सिटी : ऍचिव्हमेंट पुरस्कार 
शिकागो क्‍लब : सर्वोत्कृष्ट संघ 
बार्सिलोना 12 वर्षांखालील संघ : पहिला विशेष क्रीडा पुरस्कार 

सध्या ऍथलेटिक्‍स क्षेत्रात उसेन बोल्ट आणि उसेन बोल्ट याचेच नाव गाजत आहे. त्याची कामगिरीदेखील तशीच असल्यामुळे तो सर्वोत्तम धावपटू आहे, यात शंकाच नाही. पण, माझ्यासाठी अजूनही जेसी ओवेन्सच सर्वोत्तम आहे. 
- मायकेल जॉन्सन, माजी महान धावपटू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com