
IND vs AUS Usman Khawaja : मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून कोणाला जमलं नाही ते ख्वाजानं करून दाखवलं
IND vs AUS 4th Test Usman Khawaja : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या दिवशी 4 बाद 255 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसावर आपले वर्चस्व राखले. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने अँकर इनिंग खेळत नाबाद शतकी खेळी केली. त्याला कॅमेरून ग्रीनने नाबाद 49 धावांची आक्रमक खेळी करत चांगली साथ दिली.
विशेष म्हणजे उस्मान ख्वाजा हा यंदाच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील ऑस्ट्रेलियाकडून शतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच ख्वाजाने तीन भारतीय दौरे केल्यानंतर पहिल्यांदाच शतकी खेळी केली.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ग्रीन 49 धावा करून तर उस्मान ख्वाजा 104 धावा करून नाबाद होते. भारताकडून पहिल्या दिवशी मोहम्मद शमीने 2 तर आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
चौथ्या कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली आणि ट्रॅव्हिस हेडने ख्वाजासोबत पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. रविचंद्रन अश्विनने हेडला बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. हेडने 44 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 32 धावांची खेळी खेळली. यानंतर मोहम्मद शमीने कसोटी क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा फलंदाज मार्नस लबुशेनला 31 पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
दुसऱ्या सत्राचा खेळ पहिल्या दिवशी संपला. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 149/2 अशी होती .मात्र त्यानंतर भारताने तिसऱ्या सत्रात कांगारूंना धक्के देण्यास सुरूवात केली. रविंद्र जडेजाने धोकादायक होत असलेल्या कर्णधार स्टीव्ह स्मिथला 38 धावांवर बाद केले. याचबरोबर ख्वाजा आणि स्मिथची तिसऱ्या विकेटसाठीत 79 धावांची भागीदारी संपुष्टात आली.
जडेजापाठोपाठ मोहम्मद शमीने हँडस्कोम्बचा 17 धावांवर त्रिफळा उडवत कांगारूंना चौथा धक्का दिला. एका बाजूने कांगारूंची मधील फळी ठराविक अंतराने बाद होती तर दुसऱ्या बाजूने सलामीवीर उस्मान ख्वाजा खेळपट्टीवर ठाण मांडून बसला होता. तो हळू हळू आपल्या शतकाकडे कूच करत होता.
त्याला साथ देण्यासाठी आलेल्या कॅमरून ग्रीनने नवीन चेंडूवर आक्रमक फलंदाजी करत उस्मान ख्वाजासोबात अर्धशतकी भागीदारी रचली. दरम्यान पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही चेंडू शिल्लक असताना उस्मान ख्वाजाने आपले शतक 245 चेंडूत पूर्ण केले. तर ग्रीनने आक्रमक 49 धावांची खेळी करत पाचव्या विकेटसाठी 85 धावांची नाबाद भागीदारी रचली.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ग्रीन 49 धावा करून तर उस्मान ख्वाजा 104 धावा करून नाबाद होते. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 2 बळी टिपले.
हेही वाचा : डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...