बहीण-भावाची ग्रॅंडमास्टर जोडी

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मुंबई - चेन्नईच्या आर. वैशालीने महिला ग्रॅंडमास्टर किताब मिळवला आहे. तिचा भाऊ आर. प्रग्नानंदा याने सर्वात कमी वयात ग्रॅंडमास्टर होण्याचा पराक्रम केला आहे. बहीण-भावाने ग्रॅंडमास्टर असण्याचा प्रसंग भारतात प्रथमच घडला आहे.

वैशालीने लॅटव्हियातील रिका टेक्‍निकल ओपन स्पर्धेत नऊ फेऱ्यांत पाच गुणांची कमाई करीत तिसरा आणि शेवटचा ग्रॅंडमास्टर नॉर्म मिळवला. तिने या स्पर्धेत ३० मानांकन गुण मिळवले. ती भारतातील १७ वर्षे गटातील सर्वोत्तम खेळाडू आहे, तर जागतिक क्रमवारीत १७ वी आहे; मात्र या स्पर्धेतील कामगिरीमुळे तिचे जागतिक क्रमवारीतील स्थान नक्कीच उंचावेल.

वैशालीचा भाऊ प्रग्नानंदा जूनमध्ये ग्रॅंडमास्टर झाला होता. त्या वेळी त्याने हा किताब मिळवणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत लहान खेळाडू होण्याचा पराक्रम केला होता. हे दोघेही ग्रॅंडमास्टर आरबी रमेश यांच्या चेस गुरुकुल अकादमीत मार्गदर्शन घेतात. 

पोगोचे वेड मोडण्यासाठी  
वैशालीला लहानपणी पोगो पाहण्याचे खूप वेड होते. ते वेड सुटावे यासाठी आई- वडिलांनी वैशालीला चेस अकादमीत दाखल करण्याचे ठरवले. त्याचवेळी चित्रकलेचीही आवड लावण्याचा प्रयत्न केला होता. वैशाली अकादमीत जावी यासाठी तिचा भाऊ प्रग्नानंदा यालाही त्याच अकादमीत दाखल करण्यात आले होते. प्रग्नानंदा ग्रॅंडमास्टर झाला, त्या वेळी त्याचे वय १२ वर्षे १० महिने होते; तर वैशाली १७ वर्षांची आहे. विजयालक्ष्मी आणि मीनाक्षी सुब्रह्मण्यम या भगिनी यापूर्वी ग्रॅंडमास्टर झाल्या आहेत; पण बहीण-भावाने ग्रॅंडमास्टर होण्याची भारतातील ही पहिलीच वेळ आहे. 

वैशालीचा पराक्रम
२०१६ मध्ये महिला आंतरराष्ट्रीय मास्टर
२०१७ मध्ये आशियाई ब्लिट्‌झ स्पर्धेत विजेतेपद
वयाच्या चौदाव्या वर्षी राष्ट्रीय महिला चॅलेंजर स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम
मुंबईतील या स्पर्धेत तानिया सचदेव, मेरी ॲन गोम्स, निशा मोहोता यांना मागे टाकले होते. 
२०१२ मध्ये जागतिक १२ वर्षांखालील गटात विजेती
२०१५ मध्ये जागतिक चौदा वर्षांखालील स्पर्धेत विजेती
वयोगटाच्या स्पर्धेत दोन जगज्जेतीपदे जिंकणाऱ्या मोजक्‍या भारतीय खेळाडूंत स्थान

Web Title: Vaishali becomes Indias latest Woman Grandmaster