
मुलगी हॉकी खेळते म्हणून होता विरोध, पण तिने दिलं चोख उत्तर
आई आणि वडील भरउन्हात गाडीवर भाजी विकत होते, तेव्हा त्यांची मुलगी मुमताज खानने अतिशय अवघड असा गोल करत, ज्युनिअर वर्ल्डकप हॉकी स्पर्धेत भारताला दक्षिण कोरियाविरुद्ध 3-0 असा विजय प्राप्त करुन दिला. भारताने क्वॉर्टर फायनलमध्ये विजय मिळविण्याची ही दुसरीच वेळ आहे. (Junior Hockey world cup Mumtaz khan daughter of vegetable vendor shines)
कैसर जहाँ या लखनऊमधील तोपखाना बाजार या अतिशय गजबजलेल्या परिसरात भाजी विकत होत्या. भाजी खरेदीसाठी त्यांच्या भोवती मोठी गर्दी होती. त्याचवेळी त्यांची मुलगी मुमताज दक्षिण आफ्रिकेत पोशस्ट्रुम येथे अवघड गोल पूर्ण केला. बॉल गोलपोस्ट पासून सरकला आणि तो बॉल आपल्या गुडघ्यावर घेत पुढे हॉकी स्टीक करत तिने पुढे केली आणि बॉल कोरियाच्या गोलकिपरपासून बाजुला केला,आणि गोल पूर्ण केला.
मलेशियाविरोधात देखील मुमताजने ३ गोल करत चमकदार कामगिरी केली, आणि भारताने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. मुमताजने ज्युनिअर वर्ल्डकप हॉकी स्पर्धेत एकूण ६ गोल करत सगळ्यात जास्त गोल करणारी तिसरी खेळाडू ठरलीय. जर्मनीविरुद्धच्या मॅचमध्ये देखील मुमताजने विजयी गोल केला होता. ''एकवेळ अशी होती की, मुमताजला हॉकी खेळण्यासाठी अनेकांचे टोमणे सहन करावे लागले, पण आम्ही आणि कुटुंबाने याकडे दुर्लक्ष केलं, पण आज मुमताजने अशा सर्वांना चोख उत्तर दिल्याचं मुमताजच्या बहिणीने सांगितलं"
हेही वाचा: तो कुठे राहतो, कोणाच्या घरात राहतो? पवारांना भेटताच राऊतांचा सदावर्तेंना इशारा
२०१३ मध्ये मुमताज आगरा येथे शाळेच्या अथेलेटिक्स टिममध्ये आली होती, तेव्हा त्या स्पर्धेत ती पहिली आली होती. तिथल्या एका कोचने तिली हॉकी खेळण्याचा सल्ला दिला होता. हॉकीमध्ये चपळाई, वेग आणि एनर्जी गरजेची असते. हे सगळे गुण तिच्यात होते. त्यामुळेच तिला हॉकी खेळण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचं स्थानिक प्रशिक्षक निलम सिद्दीकी यांनी सांगितलं. एवढचं नाही तिची निडर वृत्ती तपासण्यासाठी तिला सिनियर टिममध्ये ठेवण्यात आलं, त्या टिममध्ये देखील ती अतिशय उत्तम खेळली होती.
Web Title: Vegetable Vendors Daughter Shines In Junior Womens Hockey World Cup
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..