WPL2023 : टीम इंडियानं स्मृतीला घेतलं डोक्यावर! हरमनही बोली ऐकून हरकली; Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WPL

WPL2023: टीम इंडियानं स्मृतीला घेतलं डोक्यावर! हरमनही बोली ऐकून हरकली; Video Viral

WPL2023 : विमन्स प्रिमिअर लीगचं (WPL) ऑक्शन सध्या मुंबईत सुरु आहे. यामध्ये भारताची स्टार महिला खेळाडू आणि व्हाईस कॅप्टन स्मृती मानधाना हीची पहिलीच बोली लागली. बंगळुरुच्या संघासाठी तिला तब्बल ३.४० कोटींची बोली लागली. यानंतर दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियानं ड्रेसिंग रुममध्ये एकच जल्लोष केला. याचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Video viral Pure Bliss Team India celebrated the first signing of the day smriti mandhana goes to RCB)

दक्षिण अफ्रेकत टी-ट्वेंटी मालिकेसाठी गेलेल्या भारताच्या महिला टीमनं ड्रेसिंग रुममधून लाईव्ह लिलावाचा कार्यक्रम पाहत होती. यावेळी मानधाना हिची बोली सुरु असताना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये चुरस सुरु होती. स्मृती मानधानासाठी सुरुवातीला मुंबई इंडियन्सच्या मालकीन नीता अंबानी यांनी प्रयत्न केले. पण ठराविक मर्यादेनंतर त्यांनी माघार घेतली आणि त्यानंतर बंगळुरुच्या संघानं ३.४० कोटी रुपयांची बोली लावली.

दरम्यान, मानधानानंतर हरमनप्रीत कौर हिची देखील बोली लागली. सुरुवातीला दिल्ली आणि बंगळुरुच्या संघामध्ये हरमनला घेण्यासाठी चुरस सुरु होती. १ कोटीपर्यंत तिच्यासाठी बोली लागली पण नंतर मुंबईच्या संघानं यामध्ये एन्ट्री घेत १.८० कोटींमध्ये तिला आपल्या संघासाठी निश्चित केलं. आपल्यावर लागलेली सुमारे दोन कोटी रुपयांची बोली पाहून हरमनही हरखून गेली.

किती खेळाडूंचा स्लॉट आहे?

यंदाच्या महिला प्रीमियर लीगसाठी एकूण 90 खेळाडूंचा स्लॉट आहे. यात एक संघ किमान 15 तर कमाल 18 खेळाडू घेऊ शकतात. यामध्ये विदेशी खेळाडूंसाठी प्रत्येक संघात जास्तीजास्त 6 विदेशी खेळाडू निवडण्याची मुभा आहे. पहिल्या हंगामासाठी एकूण विदेशी खेळाडूंची संख्या ही जास्ताजास्त 30 असेल तर भारतीय खेळाडूंची संख्या 60 असेल.

कोणत्या देशाचे किती खेळाडू?

ऑस्ट्रेलिया - 28, इंग्लंड 27, वेस्ट इंडीज 23, न्यूझीलंड 19, दक्षिण आफ्रिका 17, श्रीलंका 15, झिम्बाब्वे 11, बांगलादेश 9, आयर्लंड 6, युएई 4, अमेरिका, हाँग-काँग, नेदलँड्स आणि थायलंड प्रत्येकी 1, असोसिएट नेशन 8 खेळाडू.