World Cup 2019 : '3 डी' विजय अन् पाकिस्तानला पहिला धक्का

वृत्तसंस्था
रविवार, 16 जून 2019

क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नसतो पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात एका क्षणी धक्का बसला आणि दुसऱ्या क्षणी फायदाही झाला. भुवनेश्वर कुमार पायाच्या दुखातीमुळे ४.४ षटकांत पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्याच्याऐवजी गोलंदाजीस आलेल्या विजय शंकरने इमाम उल हकला बाद केले.

वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नसतो पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात एका क्षणी धक्का बसला आणि दुसऱ्या क्षणी फायदाही झाला. भुवनेश्वर कुमार पायाच्या दुखातीमुळे ४.४ षटकांत पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्याच्याऐवजी गोलंदाजीस आलेल्या विजय शंकरने इमाम उल हकला बाद केले.

त्याचे असे झाले. भुवनेश्वर आणि बुमरा यांनी भेदक माऱ्यासमोर पाकिस्तान सलामीवीर इमाम आणि फकर यांना अडचणीत पकडले होते, पण काही केल्या ते बाद होत नव्हते. भुवनेश्वर आपल्या दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू टाकून लंगडू लगाला हॅमस्ट्रिंग की गुडघा दुखापत हे लगेचच स्पष्ट झाले नाही. 

उर्वरित षटक पूर्ण करण्यासाठी विराट कोहलीने विजय शंकरला गोलंदाजी दिली आणि चमत्कार घडला त्याने विश्वकरंडकातील आपल्या पहिल्याच चेंडूवर इमामला पायचीत केले. विजयने हा बळी मिळविल्यानंतर कर्णधार विराट कोहलीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Shankar gives india first break through against Pakistan in World Cup 2019