World Cup 2019 : भारताला दुसरा धक्का; विजय शंकरलाही दुखापत

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जून 2019

भारताचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे विश्वकरंडकातून बाहेर पडावे लागले असतानाच अष्टपैलू विजय शंकरलाही दुखापत झाली आहे. त्यामुळे विश्वकरंडाकाच्या मध्यात भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे विश्वकरंडकातून बाहेर पडावे लागले असतानाच अष्टपैलू विजय शंकरलाही दुखापत झाली आहे. त्यामुळे विश्वकरंडाकाच्या मध्यात भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत. 

अफगाणिस्तानविरुद्ध शनिवारी (ता.22)होणाऱ्या सामन्यापूर्वी नेट्समध्ये सराव करत असताना त्याला ही दुखापत झाली. सरावादरम्यान जसप्रित बुमराचा यॉर्कर त्याच्या पायावर जाऊन आदळल्याने त्याला ही दुखापत झाली. 

शिखरच्या अनुपस्थितीत शंकरला झालेली दुखापत भारतासाठी मोठी चिंतेची बाब ठरू शकते. त्याने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात विश्वकरंडकात पदार्पण केले. या सामन्यात त्याने दोन बळी टीपले होते.

मात्र, त्याला झालेली दुखापत गंभीर नसून अफगाणिस्तानवरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध होण्याची शक्यता आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Shankar Suffers Injury Scare During Net Session