"सिंग इज किंग': विजेंदरचा चेकास निर्णायक ठोसा!

पीटीआय
रविवार, 18 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - ख्यातनाम भारतीय मुष्टियोद्धा विजेंदर सिंग याने टांझानियाच्या फ्रान्सिस चेका याचा निर्णायक पराभव करत जागतिक मुष्टियुद्ध संघटनेचे "आशिया-पॅसिफिक सुपर मिडलवेट' अजिंक्‍यपद कायम राखण्यात यश मिळविले. एकूण 10 फेऱ्यांच्या या सामन्यामध्ये विजेंदरने तिसऱ्याच फेरीत चेका याला निर्णयाक ठोसा लगावत धाराशयी केले.

"या सामन्यासाठी मी मॅंचेस्टर येथे दोन महिने खूप मेहनत घेतली होती. मला मदत करणाऱ्या माझ्या सर्व प्रशिक्षकांचे मी आभार मानतो. चेस्का याने सामन्याआधी खूप बडबड केली होती. मात्र माझ्या क्षमतेवर माझा विश्‍वास होता. यामुळेच मी हे यश मिळविले आहे,'' असे विजेंदर याने म्हटले आहे. या सामन्यासाठी "सिंग इज किंग' या गाण्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रवेश केलेल्या विंजेदर याला सुरवातीपासूनच प्रेक्षकांचा भक्कम पाठिंबा लाभला.

या सामन्याच्या सुरुवातीस चेका याने आक्रमक खेळ केला. मात्र विजेंदर याने आश्‍वासक खेळ करत चेका याला वेगवान व नेमक्‍या ठोशांनी जेरीस आणले. विजेंदर याला लाभलेल्या भरपूर उंचीचाही त्याने पुरेपूर फायदा उठविला. विजेंदर याच्या या नेत्रदीपक विजयानंतर येथील त्यागराज मैदानामधील प्रेक्षकांनी अक्षरश: जल्लोष व्यक्त केला. प्रेक्षकांमध्ये योगगुरु रामदेव बाबा, ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू सुशील कुमार व योगेश्‍वर दत्त, जगज्जेती बॉक्‍सर मेरी कॉम आणि केंद्रीय गृहराज्य मंत्री किरेन रिजिजुदेखील उपस्थित होते.

Web Title: Vijender Singh knocks out Francis Cheka