विजेंदरचे लक्ष्य आता राष्ट्रकुल विजेतेपदाचे

पीटीआय
सोमवार, 19 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - व्यावसायिक बॉक्‍सिंगमधील आशियाई पॅसिफिक विजेतेपद टिकविल्यानंतर भारताचा बॉक्‍सर विजेंदर सिंग याने आता आपले लक्ष्य राष्ट्रकुल विजेतेपदाचे असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली - व्यावसायिक बॉक्‍सिंगमधील आशियाई पॅसिफिक विजेतेपद टिकविल्यानंतर भारताचा बॉक्‍सर विजेंदर सिंग याने आता आपले लक्ष्य राष्ट्रकुल विजेतेपदाचे असल्याचे सांगितले.

विजेंदरने शनिवारी रात्री सुपर मिडलवेट गटातील आपले विजेतेपद कायम राखले. त्याने टांझानियाचा माजी जगज्जेता फ्रान्सिस चेका याला 10 मिनिटांच्या आत "नॉक आऊट' केले. त्याने व्यावसायिक लढतीत सलग आठवा विजय नोंदवला. या विजयानंतर विजेंदरने लीस्टरशायर येथे होणाऱ्या राष्ट्रकुल विजेतेपदाचे लक्ष्य ठेवले आहे. विजेंदरच्या सुपर मिडलवेट गटातील विजेतेपद सध्या ब्रिटनच्या ल्यूक ब्लॅकलेज याच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 27 लढतीत 22 विजय मिळवले असून, केवळ तीन पराभव स्वीकारले आहेत. दोन लढती अनिर्णित राहिल्या आहेत.

भारताचा 31 वर्षीय विजेंदर म्हणाला,""नव्या वर्षासाठी माझ्याकडे वेगळे असे नियोजन नाही. मी खेळण्यासाठीच उतरलो आहे. त्यामुळे आता केवळ एक नवी लढत डोळ्यासमोर ठेवली आहे. त्याचेच नियोजन करणार.'' राष्ट्रकुल विजेतेपदासाठी आव्हान देताना विजेंदर पुन्हा ब्रिटनला परतले. त्याची ही लढत लंडन किंवा चीन अन्यथा दुबई यापैकी एका केंद्रावर होईल.

विजेंदरने चेकाचे आव्हान सहज परतवून लावल्यावर आपले विजेतेपद शहीद जवानांना अर्पण केले. विजेंदर म्हणाला,""लढत सुरू होण्यापूर्वीच मला भारताचे तीन जवना शहीद झाल्याचे समजले. हे विजेतेपद त्यांनाच अर्पण करणे योग्य ठरेल. जवानांमुळेच आम्ही देशात सुरक्षित राहू शकतो.''

Web Title: Vijender will now target the Commonwealth title