विराट-अनुष्का बर्थडे सेलिब्रेशनसाठी 'या' निसर्गरम्य ठिकाणी

वृत्तसंस्था
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

उद्या म्हणजेच पाच नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस आहे. त्यामुळे हे दोघं आता विराटचा बर्थडे सगळ्या गोंधळापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी साजरा करणार आहे.

पारो : भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या क्रिकेटमधून ब्रेकवर आहे. तो सध्या सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खेळत नाहीये. तो सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत सुटी एन्जॉय करत आहे. उद्या म्हणजेच पाच नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस आहे. त्यामुळे हे दोघं आता विराटचा बर्थडे सगळ्या गोंधळापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी साजरा करणार आहे.

INDvsBAN : आम्ही विसरलोच मुशफिकूर बुटका आहे : रोहित शर्मा

Image may contain: 1 person, smiling, text

कोहली आणि अनुष्का सध्या भूतानमध्ये सुटी एन्जॉय करत आहेत. विराटचा वाढदिवस ते भूतानमध्येच साजरा करण्याची शक्यता आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर भूतानमधील भाजी मंडईचा फोटो शेअर करत त्याला ''भाजी मंडईत खरा आनंद मिळाला, लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या,'' असे कॅप्शन दिले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Vacation mode onn . Bhutan me Kaptaan! . PC - @awaytobhutan

A post shared by Virat Kohli Fan Club (@viratkohli.club) on

अनुष्काचा विराटसोबतचा भूतानमधील एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो काळ्या तर अनुष्का गुलाबी आणि काळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat and Anushkta might celebrate virats birthday in Bhutan