मैदान जिंकणारा विराट अनुष्कासह निघाला जग फिरायला

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 जानेवारी 2019

माऊंट मौनागुई : मैदानावरील शतक असो, सामना जिंकल्यानंतरचा आनंद साजरा करणे असो वा त्याचे आणि अनुष्काचे थाटामाटात झालेले लग्न असो. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची प्रत्येक गोष्टच ग्रॅंड असते. हाच विराट कोहली आता अनुष्कासह सुटीवर निघाला आहे. त्याची ही सफरही ग्रॅंडच आहे. विराटने अनुष्काला फिरविण्यासाठी चक्क खाजगी विमान बुक केले आहे. 

 भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळविला. त्यानंतर आता कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्कासह फिरायला रवाना झाला आहे. त्याला उरलेल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. 

कोहलीने आज त्याच्या ट्विचर अकाउंटवरुन अनुष्कासह फोटो टाकत 'Travels With Her' अशा आशयाचे ट्विट केले आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यांसाठीही अनुष्काने हजेरी लावली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohali Travels with his wife Anushka Sharma