Virat Kohli : विराट पुन्हा झाला कॅप्टन; शमीच्या गोलंदाजीवर DRS घेत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli IND vs AUS 4th Test

Virat Kohli : विराट पुन्हा झाला कॅप्टन; शमीच्या गोलंदाजीवर DRS घेत...

Virat Kohli IND vs AUS 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर - गावसकर ट्रॉफीमधील शेवटचा सामना हा अहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आजपासून सुरू झाला. आज पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिायने 4 बाद 255 धावांपर्यंत मजल मारली. पहिला दिवस हा ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाचा राहिला. मात्र यात देखील भारताने काही काळ का असेना वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आपला अतरंगी कृत्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न करत होता. आज विराट भलत्याच मूडमध्ये दिसत होता. विशेष म्हणजे विराट कोहली हेलमेट घालून सिली पॉईंट आणि शॉर्ट लेगला देखील उभा राहिला. मात्र मोहम्मद शमीच्या एका चेंडूवर विराट कोहलीने जे काही केले त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ऑस्ट्रेलियाची जोडी स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांनी जम बसवत मोठी भागीदारी करण्यास सुरूवात केली होती. ते भारतीय गोलंदाजांचा चांगलाच दम काढत होते. अशा परिस्थितीत मैदानावरील वातावरण हलके फुलके ठेवण्यासाठी विराट कोहलीने मोहम्मद शमी टाकत असलेल्या 51 व्या षटकात एक रन आऊटची मोठी अपील केली.

शमीने टाकलेला चेंडू स्मिथने शमीच्याच दिशने टोलवला होता. हा चेंडू अडवताना शमीच्या हाताला लागून तो स्टम्पवर लागला. यावेळी विराट कोहलीने एकट्याने उस्मान ख्वाजाविरूद्ध धावाबादची अपील केली. मात्र उस्मान ख्वाजा कधीच क्रीजमध्ये परतला होता. अंपायर आपल्या अपीलला दाद देत नाहीत म्हटल्यावर त्याने DRS घेण्याची अॅक्शन केली. खरं तर DRS घेण्याचा अधिकार हा फक्त कर्णधाराला असतो. मात्र विराट कोहलीने चेष्टेत का असेना स्वतःच कर्णधार असल्याचे भासवले.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर 4 बाद 255 धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजाने 251 चेंडू खेळत नाबाद 104 धावांची शतकी खेळी केली. त्याला कॅमरून ग्रीनने नाबाद 49 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. भारताकडून मोहम्मद शमीने 2 तर अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी 1 बळी घेतला आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...