भडकलेला विराट ड्रेसिंग रूममध्ये 'ते' पार्सल येताच झाला खूष, कोच द्रविडलाही फुटलं हसू | Virat Kohli Chole Bhature Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Chole Bhature Video

Virat Kohli Chole Bhature Video : भडकलेला विराट ड्रेसिंग रूममध्ये 'ते' पार्सल येताच झाला खूष, कोच द्रविडलाही फुटलं हसू

Virat Kohli Chole Bhature Video : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आपल्या घरच्या मैदानावर खेळत होता. अनेक वर्षानंतर दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावर कसोटी सामना होत होता. त्यात दिल्लीकर विराट कोहली 44 धावांवर खेळत होता. त्यामुळे दिल्लीचे फुल पॅक स्टेडियम चांगलेच उत्त्येजित झाले होते.

मात्र विराट कोहली 44 धावांवर असताना कूहमनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पायचीतची ऑस्ट्रेलियाने केलेली अपील पंचांनी उचलून धरली. मात्र विराटने लगेच DRS घेत तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांनी देखील चेंडू आधी बॅटला लागला आहे का पॅडला लागला आहे याबाबत संभ्रम असताना विराट कोहलीला बाद घोषित केले. यानंतर स्टेडियममधील सर्व क्रिकेट चाहत्यांचा ह्रदयभंग झाला.

दरम्यान, आज फलंदाजी करताना लयीत दिसणरा विराट कोहली आपल्याला ज्या पद्धतीने बाद दिले. याची कोच राहुल द्रविडकडे व्हिडिओ पाहून तक्रार करत होता. या दरम्यान कॅमेरा त्याच्यावर खिळला होता. तेवढ्यात ड्रेसिंग रूममध्ये एक व्यक्ती आला.

त्याने विराट कोहलीला आपल्या हातातील एक पार्सल दाखवले आणि कानात काहीतरी सांगितले. यानंतर भडकलेल्या विराट कोहलीचा चेहरा अचानक खुलला. त्याने टाळी वाजवून ते पार्सल आत ठेवण्यास सांगितले.

विराटचा मूड क्षणार्धात बदलणारे हे पार्सल काय आहे याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा निर्माण झाली होती. विराट कोहलीला सर्वात जास्त छोले भटुरे आवडतात. त्यामुळे हे पार्सल दिल्लीतील प्रसिद्ध छोले भटुरे असल्याचा अंदाज समालोचक आणि चाहते देखील लावू लागले. यामुळे सोशल मीडियावर छोले भटुरे ट्रेंड करू लागले. विराट कोहलीचा हा क्षणार्धात मूड बदलणाऱ्या पार्सलचा व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच