हार्दिक-नताशाच्या हॉट फोटोवर विराट म्हणाला...

वृत्तसंस्था
Thursday, 2 January 2020

हार्दिकला भारतीय क्रिकेट संघातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याने नताशा स्टॅनकोविच हिच्यासोबत साखरपुडा केल्यानंतर त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याला आश्चर्याचा सुखद धक्का दिल्याचे म्हटले आहे.

NBT

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हार्दिकने त्याच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. त्याने बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविचसोबतचे नाते सर्वांसमोर मान्य करत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले आहे. हार्दिकने नताशासोबत फोटो टाकत नवीन वर्षाचे औचित्य साधून त्याने सर्वांसमोर आपल्या प्रेमाचा खुलासा केला आहे. हार्दिक आणि नताशाने अनेक पार्ट्यांना एकत्र हजेरी लावली आहे मात्र, त्यांनी कधीच आपले नाते स्वीकारले नाही. आता मात्र, दोघांनीही आपले नाते स्वीकारले आहे. तसेच हार्दिकने फोटो शेअर करताना मै तेरा तू मेरी जाने सारा हिंदुस्तान असे म्हटले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan.01.01.2020 #engaged

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिकला भारतीय क्रिकेट संघातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. विराट म्हणाला, की अभिनंदन हार्दिक, तु सुखद धक्का दिला आहे. तुम्ही कायम एकत्र राहो, याबद्दल देवाकडे प्रार्थना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli congratulates Hardik Pandya Natasa Stankovic on engagement