कोहली खरंच किंग आहे, मैदानावर फेल तरी इन्स्टाग्रामवर सुसाट!

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

इन्स्टाग्रामवरुन कोहली वर्षभरात तब्बल 8.3 कोटी रुपयांच्या कमाई करतो. कमाईच्या यादीत तो 11व्या स्थानी आहे. फॉलोअर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने 2019मध्ये इन्स्टाग्रामवरुन जवळपास 340 कोटी रुपयांची कमाई केली होती.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला नुकत्याच झालेल्या न्यूझीलंविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामिरी करता आलेली नाही. असे असले तरी तो चर्चेत राहणे सोडत नाही. आताही तो पुन्हा चर्चेत आला आहे आणि त्याला कारण आहे त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट. 

अरेsss देवा! विराट टी20 क्रमवारीत किती खाली गेलाय बघा

त्याच्या इन्स्टाग्रामवरील प्रत्येक फोटोला चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो. आताही त्याच्या इन्स्टाग्राममुळे एक नवा विक्रम  त्याच्या नावावर झाला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर तब्बल पाच कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. असा विक्रम करणारा कोहली हा पहिलाच भारतीय आहे. त्याच्या खालोखाल प्रियांका चोप्राचा क्रमांक आहे. ती 4.99 कोटी फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Image may contain: 11 people

विंडीजच्या 'या' लोकप्रिय गोलंदाजाच्या कारला भयानक अपघात

जगभरात सर्वाधिक फॉलोअर्स पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे आहेत. त्याचे इन्स्टारग्रामवर तब्बल 20.3 कोटी फॉलोअर्स आहेत आणि तो जगात पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत त्याचा विक्रम कोणालाही मोडता आलेला नाही. 

सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील 'तो' क्षण ठरला क्रीडाविश्वात सर्वोत्तम

कोहली कमावतो 8.3 कोटी
इन्स्टाग्रामवरुन कोहली वर्षभरात तब्बल 8.3 कोटी रुपयांच्या कमाई करतो. कमाईच्या यादीत तो 11व्या स्थानी आहे. फॉलोअर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने 2019मध्ये इन्स्टाग्रामवरुन जवळपास 340 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याला एका पोस्टसाठी तब्बल 6.9 कोटी रुपये दिले जातात.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli crossed 50 million followers on Instagram