विराटचा झंझावात; पंतची फटकेबाजी; विंडीज पूर्ण हताश!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

राजकोट : इंग्लंड असो की भारत, विराट कोहली आपल्या बॅटमधून अविरत धावांचा पाऊस पाडत आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने कसोटी कारकिर्दीतील 24 वे शतक झळकावले. विराट कोहलीचे शतक आणि यष्टीरक्षक रिषभ पंतच्या वेगवान 92 धावंच्या जोरावर भारताने दुसऱ्याच दिवशी पाचशे धावांचा डोंगर रचला आहे. 

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर पंतने आक्रमक पवित्रा घेत प्रत्येक षटकात एक चौकार आणि एक षटकार मारत धावांची गती वाढवली.  101व्या षटकात रिषभ पंतने किमो पॉलला सलग एक चौकार आणि षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले. त्यापाठोपाठ कोहलीने कसोटी कारकिर्दीतील 24 वे शतक पूर्ण केले. कोहलीने अवघ्या 53 डावांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारतात 3000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. 

पृथ्वीच्या परदेश दौऱ्यांबद्दल 'या' खेळाडूने वर्तविला विश्वास

कोहलीने गेल्या पाचपैकी चार डावांमध्ये दोन द्विशतके, दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून कोहलीचे हे 30 वे शतक आहे. कोहलीने १२३ डावांमध्ये २४ शतके झळकाविली आहेत. केवळ डॉन ब्रॅडमन यांनीच यापेक्षा कमी डावांमध्ये २४ शतके केली आहेत. ब्रॅडमन यांनी केवळ ६६ डावांतच ही कामगिरी केली होती. रिषभ पंतचे शतक मात्र थोडक्यात हुकले. 108 व्या षटकात तो 92 धावांवर बाद झाला.

विरार ते राजकोट मैदान.. पृथ्वी क्षेपणास्त्र सुटले

Web Title: Virat Kohli hits 24th Test century