ICC Rankings: शतकांचा 'विराट' दुष्काळ तरी नंबर २! भन्नाट मीम व्हायरल

Virat Kohli ICC Mens ODI Player Rankings Meme Viral
Virat Kohli ICC Mens ODI Player Rankings Meme Viral esakal

दुबई : दक्षिण आफ्रिकेने भारताचा एकदिवसीय मालिकेत (ODI Series) 3 - 0 असा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या या दणदणीत विजयानंतर क्विंटन डि कॉक (Quinton de Kock) आणि रासी वॅन दर दुसेन (Rassie van der Dussen) यांच्या आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये (ICC Men's ODI Player Rankings) चांगलाची सुधारणा झाली आहे. तिसऱ्या सामन्यात शतक झळकावलेल्या डिकॉकने टॉप 5 मध्ये जागा मिळवली आहे. तर दुसेन देखील पहिल्यांदाच १० व्या स्थानावर आला आहे. (Virat Kohli ICC Mens ODI Player Rankings Meme Viral)

Virat Kohli ICC Mens ODI Player Rankings Meme Viral
वॉर्नर 'या' भारतीय खेळाडूला विचारतोय आपण कोणत्या संघात असणार?

दुसरीकडे व्हाईट वॉश मिळालेल्या भारतीय संघातील विराट कोहलीने (Virat Kohli) आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील आपले दुसरे स्थान अबाधित राखले आहे. विराट कोहलीला गेल्या दोन वर्षापासून शतक झळकावण्यात अपयश येत आहे. अनेक सामन्यात तो चांगली खेळी करतो. मात्र त्याला या खेळीचे शतकात रूपांतर करण्यात अपयश येत आहे. तरी देखील विराट कोहली आयसीसी एकदिवसीय पुरूष क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. यावरून सध्या भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

दुसरीकडे दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील आपले तिसरे स्थान शाबूत ठेवले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चांगली फलंदाजी करत तीन सामन्यात १६९ धावा करणाऱ्या खिशर धवनच्या क्रमवारीत देखील सुधारणा झाली आहे. तो आता १५ व्या स्थानावर पोहचला आहे. आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये (ICC Men's ODI Player Rankings) अव्वल स्थानावर पाकिस्तानचा बाबर आझम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com