एफसी गोवा यांच्याकडून नवीन होम जर्सीचे अनावरण

Virat Kohli launches FC Goas new home jersey for 2019-20 season
Virat Kohli launches FC Goas new home jersey for 2019-20 season

पणजी (गोवा) : एफसी गोवा यांच्याकडून 2019/20 हंगामासाठी नवीन होम जर्सीचे बाम्बोलिम अॅथलेटिक ग्राऊंडवर भारताचा युथ आयकन, एफसी गोवाचा सहमालक आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या उपस्थितीत अनावरण पार पडले.

नवीन जर्सी आणि वार्षिक उपक्रम असलेल्या बी गोवाची घोषणा जवळपास 3000 जणांच्या समूहासमोर करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून गोवन लोकांच्या स्पिरिटची देखील ओळख होते. त्यांच्या युथ डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या मदतीने अनेक युवा फुटबॉल खेळाडूंना मुख्य संघापर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते. यावेळची जर्सी ही 'ऑरेंज' रंगाची असून, या माध्यमातून राज्याचे किनारे आणि सुंदर सूर्यास्त यांचे प्रतिबिंब पाहण्यास मिळते. गेल्या काही वर्षातील क्लब मधील बदल आपल्याला जर्सीच्या माध्यमातून अनुभवण्यास मिळणार आहे.

कोहली म्हणाला, 'गोव्याला आल्यावर नेहमीच आनंद होतो. येथील चाहते फुटबॉल आणि एफसी गोवासाठी नेहमीच अग्रेसर असतात. देशातील क्रीडा संस्कृती वाढत आहे याचा अनुभव येतो. येथील घरे आणि गाडया क्लबच्या रंगाने रंगवलेल्या आहेत. या सर्व गोष्टी लक्षवेधक ठरतात. संघ चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या दोन हंगामात त्यांनी आपली चमक दाखवली आहे. सुपर कपमधील विजयानंतर संघात आणखीन हुरूप आला आहे. क्लबच्या माध्यमातून युथ डेव्हलपमेंट आणि ग्रासरुट कार्यक्रमावर भर दिला जात आहे. संघाची खेळण्याची शैली आणि मिळालेले यश पाहता मी आनंदी आहे. अजून आम्हाला खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे आणि भारतीय फुटबॉलचा चेहरा मोहरा बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे.'

एफसी गोवा संघाबद्दल:
एफसी गोवा व्यावसायिक फुटबॉल क्लब असून इंडियन सुपर लीग (आयएसएल) मध्ये सहभाग नोंदवतो. सुपर कप व गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेचे जेतेपद त्यांच्याकडे आहे. आयएसएलमधील हा क्लब एक यशस्वी संघ आहे. त्यांनी या स्पर्धेत विक्रमी चार वेळा प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवले आहे. 2015 आणि 2019 मध्ये त्यांनी उपविजेतेपद मिळवले. आयएसएल इतिहासात क्लबने सर्वाधिक गोल मारले आहेत आणि जीएफए 20 वर्षाखालील आणि जीएफए 18 वर्षाखालील स्पर्धेचे ते चॅम्पियन आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com