
Virat Kohli: विराटला करौली बाबा पावले; कसोटीत तीन वर्षानंतर विराटनं ठोकलं शतकं
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने दमदार शतक ठोकले आहे. 2019 नंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार शतक झळकावल्यामुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच सोशल मीडियावर विराटला नीम करौली बाबा पावले अशी चर्चा रंगली आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. विराट कोहलीने 23 नोव्हेंबर 2019 रोजी कसोटी सामन्यात शेवटचे शतक झळकावले. कोलकाता येथे बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत विराटने शतक झळकावले.
आता 3 वर्षे, 3 महिने आणि 17 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विराटने कसोटी सामन्यात शतक ठोकले आहे. त्याचे कसोटी क्रिकेटमधील हे 28 वे शतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ७ वेळा तीन गुणांचा टप्पा गाठला आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 75 वे शतक झळकावले आहे. विराटने 241 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे.
त्याची ही खेळी पाहून विराटला करौली बाबा पावले अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या शतकानंतर अनुष्काने नीम करौली महाराजांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली क्रिकेटमधून वेळ काढून देवदर्शन करताना दिलत आहे. महाकालच्या दर्शनासाठी ते वृंदावन, हरिद्वार आणि उज्जैन येथेही पोहोचला होता.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विराट कोहली आपल्या कुटुंबासह नैनिताल जिल्ह्यातील भवाली येथील कैंची धाम येथे गेला होता. नीम करौली बाबाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मुक्तेश्वरमध्ये काही दिवस घालवले. या वर्षी जानेवारी महिन्यातही तो कुटुंबासह वृंदावन येथील नीम करौली बाबांच्या आश्रमात पोहोचले होते.
जानेवारीमध्येच तो ऋषिकेशमधील मुनी की रेती येथील स्वामी दयानंद आश्रमातही पोहोचला होता. विराटने स्वामी दयानंद यांच्या समाधीवर प्रार्थना करण्याच्या विधीत भाग घेतला. त्यानंतर त्यांनी संतांना भोजनही दिले. त्यांची भेटही गोपनीय होती.