INDvsSA : हा क्रेझी विक्रम करणार कोहली जगातला पहिला फलंदाज

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

शिखर धवनची आक्रमक सलामी आणि त्यानंतर किंग कोहलीची लाजवाब 72 धावांची टोलेबाजी यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या ट्‌वेंटी20 सामन्यात सात विकेटने पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली. कोहलीने त्याने केलेल्या 72 धावांच्या जोरावर क्रिकेटमध्ये असा विक्रम केला आहे जो आजवर कोणत्याच फलंदाजाने केलेला नाही. 

मोहाली : शिखर धवनची आक्रमक सलामी आणि त्यानंतर किंग कोहलीची लाजवाब 72 धावांची टोलेबाजी यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या ट्‌वेंटी20 सामन्यात सात विकेटने पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली. कोहलीने त्याने केलेल्या 72 धावांच्या जोरावर क्रिकेटमध्ये असा विक्रम केला आहे जो आजवर कोणत्याच फलंदाजाने केलेला नाही. 

कोहलीने तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये 50+ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये 50+ सरासरीने धावा करणारा तो केवळ एकमेव फलंदाज आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये 53.14च्या सरासरीने खेळत आहे तर एकदिवसीय आणि ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये अऩुक्रमे 60.31 आणि 50.85च्या सरासरीने खेळत आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 79 सामन्यांमध्ये 6749, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11,520 आणि ट्वेंटी20 क्रिकेटमद्ये 2441 धावा केल्या आहेत. 

दरम्यान मोहलीमध्ये झालेल्या सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवला.  तीन वर्षांपूर्वी याच मैदानावर ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक सामन्यात विराट कोहलीने तुफानी खेळी करून ऑस्ट्रेलियाला शरण आणले होते. आज दक्षिण आफ्रिकेच्या गोलदाजांनी तशीच अवस्था केली त्यामुळे विजयासाठी असलेले 150 धावांचे आव्हान भारताने 19 षटकांत पार केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli is the only batsman to have 50 plus average in all 3 formats