..म्हणून विराटची 150 वी कसोटी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर व्हावी

Virat Kohli Pakistani Fan Hussain Ahmad
Virat Kohli Pakistani Fan Hussain Ahmadesakal

विराट कोहली मोहलीत आपला 100 वा कसोटी (Virat Kohli 100th Test) सामना खेळत आहे. मात्र मोहालीपासून 292 किमी अंतरावर असलेल्या पाकिस्तानातील गुजरानवालामधील हुसैन अहमद (Hussain Ahmad) याचा जीव मात्र कासावीस झाला आहे. कारण भारत पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील वादामुळे सीमा बंद आहेत आणि त्याला आपल्या लाडक्या विराटचा सामना बघायला जाता येत नाही. हा हुसैन अहमद पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये विराट कोहलीचे पोस्टर झळकावून त्याच्या नावाच्या घोषणा देण्याने भारतात चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. (Virat Kohli Pakistani Fan Hussain Ahmad)

Virat Kohli Pakistani Fan Hussain Ahmad
विराटने 100 व्या कसोटीत पाँटिंगच्या हातावर मारला हात

विशेष म्हणजे हुसैनच्या मायदेशात 24 वर्षानंतर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात कसोटी सामना रंगत आहे. हा सामना देखील 4 मार्चलाच सुरू झाला. मात्र हुसैनला या सामन्याची नाही तर भारत श्रीलंका कसोटी सामन्यात रस आहे. तो म्हणाला की, 'दोन्ही देशांच्या बॉर्डरने थांबवून ठेवले आहे नाही तर किंग कोहलीच्या शंभराव्या कसोटीसाठी मी नक्कीच गेलो असतो.'

तो पुढे म्हणाला की, 'माझ्या नशिबात विराट कोहलीची 100 वी कसोटी नव्हती. मात्र माझी इच्छा आहे की त्याने त्याचा 150 किंवा 200 वा कसोटी सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर (Gadaffi Stadium) व्हावा आणि मी त्याच्यासाठी चिअर करावं' हुसैनला विराटने मोहालीत शंभर करावा असे वाटते. यामुळे त्याचा शतकांचा दुष्काळ संपुष्टात येईल. तो एक दिवस शाहीन आफ्रिदीचा गद्दाफी स्टेडियमवर सामना करेल अशीही त्याला आशा आहे.

Virat Kohli Pakistani Fan Hussain Ahmad
#VK100 : शंभराव्या कसोटीतील विराट अनुष्काचे 'रोमँटिक' फोटो

एका पाकिस्तानी हवालदाराचा मुलगा असूनही हुसैनच्या कोहली प्रेमाला (Hussain Ahmad Kohli Affection) विरोध झाला नाही. हुसैन अहमद हा विराट कोहलीने 2008 मध्ये ज्यावेळी 19 वर्षाखालील वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याचा फॅन झाला होता. त्याने या सामन्याचे पेपर कटिंग अजून जपून ठेवलेले आहे. त्याच्या वडिलांचा देखील त्याच्या विराट प्रेमाला विरोध नाही. हुसैन सांगतो की वडिलांनी कधीही त्याला कोहली किंवा भारतीय संघाला पाठिंबा देण्यापासून रोखले नाही. फक्त रात्री जागून सामने बघायला त्यांचा विरोध आहे. तेव्हा हुसैन वडिलांच्या शिव्या खातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com