पाकिस्तानच्या मैदानात विराट-रोहित जोडगोळीची पोस्टरबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs PAK

पाकिस्तानच्या मैदानात विराट-रोहित जोडगोळीची पोस्टरबाजी

रावळपिंडी : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (PAK vs AUS) यांच्यात रंगलेल्या कसोटी सामन्यात विराट-रोहितची क्रेझ पाहायला मिळाली. रावळपिंडीच्या मैदानात सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी काही चाहत्यांनी लक्षवेधून घेतले. यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली या जोडीचा चाहता वर्ग पाहायला मिळाला. विराट कोहलीने पाकिस्तानच्या मैदानात आपले शतक पूर्ण करावे, अशी भावना या चाहत्यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानविरूदध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना सुरू असताना भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीचे (VIRAT KOHLI) पोस्टर दिसले. विराटच्या 71 व्या आंतरराष्ट्रीय शतकाचे चाहते खुप दिवसापासून वाट पाहत आहेत. विराटचे बहुप्रतिक्षित शतक पाकिस्तानच्या मैदानात व्हावे, अशी भावना पाक चाहत्यांनी व्यक्त केली. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला असताना काही चाहते विराट आणि रोहित प्रेम दाखवून देताना दिसले. या पोस्टरबाजीचे फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हेही वाचा: जर्मन महिलेमुळे शेन वॉर्नच्या मृत्यूचं वाढलं गुढ; थायलंड पोलीस चौकशी सुरू

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरणामुळे या दोन्ही देशांतील द्विपक्षीय मालिकेला ब्रेक लागला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भारतीय संघासोबत खेळण्यास तयार असला तरी भारतीय संघ पाकिस्तानला भाव देत नाही. त्यामुळे पाकिस्तान चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणे तसे अशक्यच आहे. भारत-पाकिस्तान दोन्ही संघ एकेमकांविरुद्ध केवळ आयसीसीच्या स्पर्धेत खेळताना दिसते. युएईच्या मैदानातील टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता 23 ऑक्टोंबर रोजी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतविरूद्ध पाकिस्तान टी-20 चा थरार पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा: चेन्नई बॉईज इज बॅक; धोनीचे IPL 2022 मिशन सुरू

Web Title: Virat Kohli Poster Pakistan Vs Australia Match

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CricketsportsVirat kohli
go to top