World Cup 2019 : रोहितच्या शतकावर विराट खूश; केले तोंडभरुन कौतुक

वृतसंस्था
गुरुवार, 6 जून 2019

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने खणखणीत शतक साजरे केले. त्याच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 228 धावांचा भारताने सहज पाठलाग केला. भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकला. रोहितची ही खेळी पाहून कर्णधार विराट कोहली आवाक झाला आहे. Hats Off रोहित शर्मा अशा शब्दांत त्याने रोहितचे कौतुक केले आहे. 

वर्ल्ड कप 2019 : साउदम्पटन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने खणखणीत शतक साजरे केले. त्याच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 228 धावांचा भारताने सहज पाठलाग केला. भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकला. रोहितची ही खेळी पाहून कर्णधार विराट कोहली आवाक झाला आहे. Hats Off रोहित शर्मा अशा शब्दांत त्याने रोहितचे कौतुक केले आहे. 

''खेळ कसा बदलत गेला किंवा खेळपट्टीकडे पाहिल्यानंतर कळते की सामना किती आव्हानात्मक होता. Hats Off रोहित! त्याने खूप छान फलंदाजी केली. स्पर्धातील पहिला विजय खूप महत्त्वाचा असतो. आम्हाला फलंदाजीमध्ये चांगाली फलंदाजी करायची होती आणि त्यामुळेच रोहितची खेळी खूप खूप खास आहे. राहुलने त्याच्यासह चांगली फलंदाजी केली तर धोनीने शांतपणे त्याला साथ दिली. हार्दिकने एक फिनिशर म्हणून चांगली कामगिरी केली,'' अशा शब्दांत कोहलीने रोहितसह सर्वांचे कौतुक केले. 

त्याने विश्वकरंडकातील दुसरे तर एकदिवसीय कारकिर्दीतील 23वे शतक साजरे केले. याच शतकासह त्याने भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीला मागे टाकले. गांगुलनीने एकदिवसीय कारकिर्दीत 22 शतकं केली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli praises Rohit Sharma after a clash against SA in World Cup 2019