आम्हाला नंबर वन बनायचं होतं; आता तुम्हीच पाहताय रिझल्ट : विराट कोहली

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 3-0 विजय मिळवताना केलेला सांघिक खेळ खरच अभिमान वाटावा असा आहे. भारतीय संघाच्या विचारात बदल झालाय त्याचा हा परिणाम आहे. सर्व खेळाडू फक्त संघाचा विचार करून खेळतात. जम बसतो तो फलंदाज संघाला पैलतीरी नेणारी खेळी करतो. ​

रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 3-0 विजय मिळवताना केलेला सांघिक खेळ खरच अभिमान वाटावा असा आहे. भारतीय संघाच्या विचारात बदल झालाय त्याचा हा परिणाम आहे. सर्व खेळाडू फक्त संघाचा विचार करून खेळतात. जम बसतो तो फलंदाज संघाला पैलतीरी नेणारी खेळी करतो. रोहित शर्माने मालिकेत केलेली फलंदाजी अफलातून होती. कसोटी सामन्यात सलामीला जाताना करायला लागणारे मानसिक बदल त्याने अंगीकारले आणि फारच मोठ्या खेळ्या उभारल्या. तीच गोष्ट मयांक आगरवालची आहे आणि अजिंक्य रहाणेचीही.

विजयी टीमची ड्रेसिंगरुममध्ये वाट बघत होतं खास सरप्राईज!

भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास मला वाटते की वेगवान गोलंदाजांच्या विचारात लक्षणीय बदल झालाय. त्यांच्या तंदुरुस्तीत फरक पडलाय. कोणत्याही खेळपट्टीवर प्रभावी मारा करता येतो असा विश्वास त्यांना जाणवू लागला आहे. रांची सामन्यात उमेश यादव आणि महंमद शमीने केलेला मारा काय तिखट होता. दक्षिण आफ्रिकन फलंदाजांची भंबेरी उडवली त्यांनी.

माझा संघ सतत खेळात सुधारणा करण्याच्या ध्यासाने पछाडलेला आहे. आम्ही विजयाचा आनंद घेऊन पण वाहवत जाणार नाही. एक मात्रं नक्की आहे ते म्हणजे भारतीय संघाला भारतात पराभूत करणे किती कठीण झाले याचा अंदाज बाकी संघांना आलेला असेल इतका आपला संघ सर्वांगीण क्रिकेट खेळण्याकडे वाटचाल करू लागला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli praises team india after win against south africa