कोहलीने केले भारत-पाक सामन्यावर मोठे वक्तव्य

Sakal | Saturday, 23 February 2019

विराट कोहलीनेही भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याप्रमाणेच याबाबत केवळ बीसीसीआय आणि सरकारचे आदेश मानणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. संघातील प्रत्येक खेळाडू देशासोबत असल्याने आता बीसीसीआय आणि सरकारनेच निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले आहे. 

 वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वकरंडकामध्ये सामना खेळवला जाणार का यावर सध्या मैदानाबाहेर युद्ध सुरु आहे. काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात विश्‍वकरंडकात होणाऱ्या सामना रद्द करावा अशी मागणी राजकारणी आणि माजी क्रिकेटपटूंनी केली आहे. अशातच भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघातील खेळाडूंच्या पाकिस्तानविरु्ध सामना खेळण्याबाबात भावना स्पष्ट केल्या आहेत. 

विराट कोहलीनेही भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याप्रमाणेच याबाबत केवळ बीसीसीआय आणि सरकारचे आदेश मानणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. संघातील प्रत्येक खेळाडू देशासोबत असल्याने आता बीसीसीआय आणि सरकारनेच निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले आहे. 

येत्या 27 फेब्रुवारीला  दुबई येथील आयसीसीच्या मुख्य कार्यालयात पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यात बैठक होईल. या बैठकीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे भवितव्य ठरवले जाईल.