
Virat Kohli: ''दारू पिल्यानंतर मी कुणालाच ऐकत नव्हतो...''पत्नी अनुष्कासमोर विराटचा मोठा खुलासा
virat kohli : भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली हा सध्याच्या सर्वात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक आहे. आपल्या शानदार फलंदाजीसाठी ओळखला जाणारा कोहली युवकांना फिटनेसबाबतही प्रेरित करतो. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तो खूप मेहनत करतो. मात्र विराट पूर्वीही दारू प्यायचा हे फार कमी लोकांना माहिती आहे. याचा खुलासा त्यानेच अनुष्का शर्मासमोर केला आहे.
रॅपिड-फायर राउंड दरम्यान कोहली आणि अनुष्काला विचारण्यात आले, "डान्स फ्लोअरवर कोण रॉक करत" ज्याकडे अनुष्काने कोहलीला इशारा केला. विराट आश्चर्यचकित झाला आणि अनुष्काकडे पाहत म्हणाला, "क्या मैं डांस फ्लोर पे धमाल मचाता हूं?" कोहलीने जुन्या काळातील एक गोष्ट सांगितली. तो पार्ट्यांमध्ये कशी मजा करत असे.
अवॉर्ड सोहळ्यादरम्यान कोहलीने एक मुलाखत दिली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अनुष्का शर्माही होती. दोघांनी अनेक मजेशीर प्रश्नांची उत्तरे दिली. कोहलीने कबूल केले की त्याने तरुणपणातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आणि तो एक मोठा फूडी होता. त्याने हे देखील उघड केले की तो फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी तो खूप पार्टी करत होता, यादरम्यान तो दारू पिऊन नाचत होता.
कोहली म्हणाला, मी आता मद्यपान करत नाही, पण जर आधी पार्टीत प्रवेश केल्यानंतर दोन ड्रिंक झाल्या की लोकांना मला तिथे बघायचे नाही. दोन-तीन ड्रिंक्स नंतर मग मला कोणाचीच पर्वा नव्हती. मात्र आता असे अजिबात राहिलेले नाही. ही तर जुन्या दिवसांची गोष्ट झाली आहे. विराटचे हे उत्तर ऐकून अनुष्का शर्मा चकित झाली आणि तीही हसली.
कोहली सध्या बंगळुरूमध्ये आहे. तो त्याच्या आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सोबत आगामी हंगामाच्या तयारीत व्यस्त आहे. फ्रँचायझीने रविवारी आरसीबी अनबॉक्स इव्हेंटचे आयोजन केले होते. यादरम्यान आरसीबीने आपली नवीन जर्सी लाँच केली. आरसीबीचे दोन माजी दिग्गज ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स या कार्यक्रमाला उपस्थित होते.