राजीनाम्यानंतर राहुल गांधींकडून किंग कोहलीचं सांत्वन | Virat Kohli Resigned | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli And Rahul Gandi

राजीनाम्यानंतर राहुल गांधींकडून किंग कोहलीचं सांत्वन

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिका गमावल्यानंतर आपल्या कसोटी संघातील कर्णधारपदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. कोहलीच्या राजीनाम्यावरुन नेटकऱ्यांनी BCCI वर टीकेची झोड उठवली असून यामागे मोठं राजकारण असल्याची टीकाही नेटकऱ्यांनी केली आहे. (Virat Kohli Resigned To Captain Of Test Team)

विराट कोहलीने ज्यावेळी भारतीय T-20 संघाचे कर्णधारपद सोडले होते त्यानंतर त्याला वनडे संघाचेही कर्णधारपद सोडावे लागले होते. त्यावेळीही लोकांनी BCCI वर टीकेची झोड उठवली होती. तर काही नेटकऱ्यांनी कोहलीवरही टीका केली होती. पण आता कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्याने नेटकऱ्यांनी ट्विटरवर #ShameOnBCCI असा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनीसुद्धा ट्वीट करुन आम्ही अशावेळेतसुद्धा तुझ्यासोबत आहोत असं म्हटलं आहे.

या ट्वीटमध्ये राहूल गांधी यांनी म्हटलंय की, ''प्रिय विराट, तुझ्या लाखे क्रिकेट चाहत्यांनी इतके वर्षे तुझ्यावर प्रेम केलंय. ते तुझ्यावर या काळातसुद्धा प्रेम करत राहतील आणि तुला पाठिंबा देत राहतील. तुझ्या येणाऱ्या नवीन इनिंगसाठी शुभेच्छा.''

अशा शब्दांत ट्वीट करुन राहूल गांधी यांनी विराट कोहलीला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर अनेक विराट चाहत्यांनीदेखील BCCI वर टीका करुन आपला पाठिंबा विराटला असल्याच्या पोस्ट सोशल मिडियावर केल्या आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top