INDvSA : पुण्यात पाऊल अन् कोहलीचा कर्णधार म्हणून मोठा विक्रम 

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला पुण्यात सुरवात झाली. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेकीसाठी मैदानात पाऊल ठेवताच त्याने एक मोठा विक्रम केला आहे. 

पुणे : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला पुण्यात सुरवात झाली. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेकीसाठी मैदानात पाऊल ठेवताच त्याने एक मोठा विक्रम केला आहे. 

INDvsSA : फलंदाज, गोलंदाजांच्या क्षमतेची कसोटी; भारत 1 बाद 75

कोहली आज भारताचा कर्णधार म्हणून 50वा कसोटी सामना खेळत आहे. 50 कसोटी सामन्यांत कर्णधारपद भूषविणारा कोहली हा भारतचा केवळ दुसरा कर्णधार आहे. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने हा विक्रम केला होता. 

हा विक्रम करताना कोहलीने भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा 49 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करण्याचा विक्रम मोडला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli Scales Huge Milestone in 2nd test against South Africa