Virat Kohli : 424 दिवस अन् 15 डाव... अखेर विराटने विक्रमासह बॅट उंचावलीच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Test Cricket Record

Virat Kohli : 424 दिवस अन् 15 डाव... अखेर विराटने विक्रमासह बॅट उंचावलीच!

Virat Kohli Test Cricket Record : भारताने चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा 3 बाद 289 धावा केल्या होत्या. विराट कोहली 59 धावा करून नाबाद होता तर त्याला साथ देणारा रविंद्र जडेजा 13 धावा करून नाबाद आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीच्या बॅटमधून बऱ्याच काळानंतर अर्धशतक आले असून उद्या त्याच्याकडून शतकी खेळीची अपेक्षा आहे.

विराट कोहलीने जवळपास 424 दिवस आणि 15 इनिंगनंतर कसोटीत अर्धशतक झळकावले. याचबरोबर विराट कोहलीने मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 4000 धावा देखील पूर्ण केल्या. कसोटीत मायदेशात 4000 पेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहली ही 5 वा भारतीय फलंदाज ठरला. मात्र त्याने सर्वात वेगाने 58 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत.

कसोटीत मायदेशात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 7216 धावा केल्या आहेत. तर त्याच्यानंतर राहुल द्रविड (5598), सुनिल गावसकर (5067) आणि विरेंद्र सेहवागचा (4656) नंबर लागतो. सध्या खेळत असलेल्या भारतीय फलंदाजांमध्ये विराट कोहलीनंतर चेतेश्वर पुजाराने मायदेशात सर्वात जास्त धावा केल्या आहेत. त्याने 3839 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीकडून अहमदाबाद कसोटीत आपला कसोटी शतकांचा दुष्काळ संपवण्याची अपेक्षा आहे. विराट कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेश विरूद्ध शतकी खेळी केली होती, त्यानंतर कसोटीत त्याने शतकी खेळी केलेली नाही. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत 79 धावांची खेळी केली होती.

त्यानंतर त्याला 50 धावा पार करता आलेल्या नाहीत. त्याने अहमदाबाद कसोटीतील अर्धशतकापूर्वी दोन वेळा 40 पेक्षा जास्त धावा केल्या. मात्र त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली होती.

(Sports Latest News)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण