INDvBAN : 'विराट' शतकासह कोहलीची सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी

वृत्तसंस्था
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

विराटने 188 डावांमध्ये 41 शतके झळकाविली आहेत. मात्र, हा पल्ला गाठायला पाँटिंगला 376 डाव खेळावे लागले होते. 

कोलकाता : ईडन गार्डनवर सुरू असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी साकारली. आणि बांगलादेशी गोलंदाजांचा धुरळा उडवत त्याने कसोटी क्रिकेटमधील 27 वे शतक साजरे केले. 

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी केलेली अर्धशतकी खेळी आणि विराट कोहलीच्या शतकी खेळीवर भारताने बांगलादेशपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. कोहलीने केलेल्या या शतकी खेळीबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली.

INDvBAN : रन-मशिनच्या नावावर आणखी एक 'विराट' विक्रम!

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 27 शतके सचिनने झळकावली आहेत. या विक्रमाशी विराटने आज बरोबरी केली. सचिन आणि विराटने 141 डावांमध्ये 27 शतके झळकावली आहेत.  

तसेच कर्णधार म्हणून विराट कोहलीचे 41 वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आहे. या शतकासह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरीदेखील साधली आहे. विराटने 188 डावांमध्ये 41 शतके झळकाविली आहेत. मात्र, हा पल्ला गाठायला पाँटिंगला 376 डाव खेळावे लागले होते. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन अव्वलस्थानी कायम आहेत. त्यांनी 70 डावांमध्ये 27 शतके झळकावली आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने 368 डावांत 33 शतके झळकाविली आहेत.

INDvBAN : ऐतिहासिक कसोटीत ईशांतने केली 'या' विक्रमांची नोंद! 

ऐतिहासिक ठरलेल्या या कसोटीत कोहलीने 161 चेंडूंत 102 धावा करत दिवस-रात्र कसोटीत शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. कोहली हा दिवस-रात्र कसोटीत शतक झळकावणारा पाचवा कर्णधार ठरला आहे. आणि कर्णधार म्हणून विराटचे हे 20 वे शतक ठरले आहे. यातही विराटने रिकी पाँटिंगला (19) मागे टाकल्याचे दिसून येते. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ 25 शतकांसह टॉपर ठरला आहे.

दिवस-रात्र कसोटीत शतक झळकावणारे कर्णधार :

1) फाफ डू प्लेसिस (दक्षिण आफ्रिका) - 2016 

2) स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) - 2016 

3) जो रूट (इंग्लंड) - 2017 

4) केन विल्यमसन (न्यूझिलंड) - 2018

5) विराट कोहली (भारत) - 2019

INDvBAN : 'एक ही दिल है विराट भाई, कितनी बार जितोगे!'

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विराट हा सर्वाधिक कसोटी शतके ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने 10 शतके झळकावत सुनील गावस्कर (9 शतके) यांना मागे टाकले आहे. 

याआधी कसोटीत पहिले शतक झळकविण्याचा मान लाला अमरनाथ (1933) यांच्या नावावर आहे. तर एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव (1883) आणि टी-20 मध्ये सुरेश रैना (2010) मध्ये शतक झळकावले आहे. दिवस-रात्र एकदिवसीय सामन्यात संजय मांजरेकर (1991) आणि दिवस-रात्र टी-20 सामन्यात रोहित शर्मा (2015) या भारतीयांनी पहिले शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.    

दरम्यान, शुक्रवारी कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा आधारस्तंभ असलेल्या चेतेश्वर पुजाराने अर्धशतकी खेळी केली होती. आज दुसऱ्या दिवशी खेळाला सुरवात झाल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही विराटसोबत डावाला आकार दिला. यावेळी रहाणेने 69 चेंडूंत 7 चौकारांच्या साथीने 51 धावांची अर्धशतकी खेळी साकारली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

So #TeamIndia head to Lunch on 289/4. Kohli 130*  #INDvBAN @paytm #PinkBallTest

A post shared by Team India (@indiancricketteam) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli scores 27th Test century and equals to record of Sachin Tendulkar