IND Vs PAK: कोहलीचं 'विमेन इन ब्लू'साठी स्पेशल 'चीयर्स'!

सध्या त्याच्या 100 वा कसोटी (Viarat Kohli) सामन्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.
Indian Women Cricket Team
Indian Women Cricket Teamesakal

Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली केवळ त्याच्या फलंदाजीमुळे प्रसिद्ध नाही तर हटके स्टाईलसाठी देखील (Indian Cricket Team) चर्चेत असतो. सध्या त्याच्या 100 वा कसोटी (Virat Kohli) सामन्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. असं असताना त्यानं एक खास व्हिडिओ शेयर केला आहे. यावेळी त्यानं चाहत्यांना (Social media news) खास आवाहनही केलं आहे. भारताचा लोकप्रिय क्रिकेटस्टार आणि माजी कॅप्टन विराट कोहलीने आगामी महिला एकदिवसीय विश्वचषकात नेटकऱ्यांना त्यानं एक गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे भारत आणि पाकिस्तान मॅचच्या आधी 'वुमन इन ब्लू'साठी चीयर अपची. (Indian Cricket Women Team Post)

महिला एकदिवसीय विश्वचषक आजपासून सुरू होतो आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये अतिशय अटीतटीचा सामना सहा मार्चला होणार असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मोहाली इथे 100 वी टेस्ट मॅच खेळायला तयार असलेल्या कोहलीने ने भारतीय महिला क्रिकेटर्सना बळ देत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी एक अनोखा व्हीडिओ 'कू' वर पोस्ट केला आहे. 40 सेकंदाच्या या व्हीडिओत महिला क्रिकेटर्सच्या कामगिरीची झलक पहायला मिळते. कोहलीनं लिहिलं आहे की, आता आपण आपली ताकद दाखवून द्यायला हवी. ती वेळ आली आहे. महिला क्रिकेट संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण तयार व्हायला हवे.

Indian Women Cricket Team
युक्रेनवरून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन येणारा पायलट काय म्हणाला? Viral Video

काही वर्षांमध्ये भारतात महिला क्रिकेट वेगात लोकप्रिय होताना दिसते आहे. स्मृति मंधाना, मिताली राज आणि झूलन गोस्वामी अशा महिला क्रिकेटर्सची नावे भारतीय क्रिकेटरसिकांच्या पसंतीची नावं आहे. भारत पाकिस्तान सामन्याची नेहमीच क्रिकेट रसिकांना उत्सुकता असते. त्याची क्रेझ बॉलीवूडमध्येही दिसून येते. यावेळी अनेक बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी देखील महिला संघाला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत.

Indian Women Cricket Team
Viral Video: मलायकाचा 'KISS', कागदावरील मासा झाला जिवंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com