11 वर्षे झाली विश्वास बसत नाही; कोहलीचं भावनिक ट्विट

वृत्तसंस्था
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

भारताचा कर्णधार विराट कोहली याने काल (ता.18) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 वर्षे पूर्ण केली. त्याबद्दल त्याने ट्विटरवर अत्यंत भावनिक पोस्ट केली आहे

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली याने काल (ता.18) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 वर्षे पूर्ण केली. त्याबद्दल त्याने ट्विटरवर अत्यंत भावनिक पोस्ट केली आहे. 

2008मध्ये 18 ऑगस्टला कोहलीने श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताला तो सामना गमवावा लागला मात्र, देशालाच नाही तर पूर्ण जगाला एक हिरा गवसला. त्याने याच श्रीलंकेविरुद्ध 2009मध्ये कारकिर्दीतील पहिले शतक झळकाविले.  

''लहान असताना 2008मध्ये मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरवात केली. आता 11 वर्षांनंतर देवाने मला एवढे आर्शीवाद दिले यावर माझा विश्वास बसत नाही. तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी बळ मिळो,'' असे ट्विट त्याने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli Shares Emotional Post after Completing 11 Years In International Cricket