कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

पर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यात चहापानानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने पीटर हॅंडस्कॉंबचा एका हातात अप्रतिम झेल घेतला. पहिल्या कसोटी सामन्यात उस्मान ख्वाजाने कोहलीला असाच काहीसा झेल घेत बाद केले होते. कोहलीने आज त्याची पुनरावृत्ती करत हॅंडस्कॉंबला बाद केले. कोहलीच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर ट्विटरच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. 

सामन्याच्या 56व्या षटकात ईशांत शर्माने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर हॅंडस्कॉंब सात धावांवर बाद झाला. ईशांतने टाकलेल्या चेंडूला त्याच्या बॅटची कड लागली आणि दुसऱ्या स्लिपमध्ये उभा असलेल्या कोहलीने उजव्या बाजूला झेपावत एका हातात अप्रतिम झेल टिपला.   

Web Title: virat kohli super catch