शास्त्रींच्या नेतृत्वाखाली खेळाडू समाधानी व आनंदी : विराट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

चेहरा हाच माझा आरसा
माझा चेहरा बोलका आहे. त्यापासून मी कोणतीही गोष्ट लपवू शकत नाही. मला तांत्रितपणे वागता येत नाही. जर मी कोणाचा तिरस्कार करत असेन ते ते माझ्या चेहऱ्यावर दिसून येते, असे सांगत विराटने संघात कोणाबरोबरही मतभेद नसल्याचा आवर्जून उल्लेख केला.

मुंबई : एकीकडे भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जात असताना मायदेशात प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. शास्त्री यांनी पुन्हा प्रशिक्षक होण्यास पाठिबा देणार का या प्रश्नावर विराट म्हणाला, सल्लागार समितीने मला काहीही विचारेले नाही, पण शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू समाधानी आणि आनंदी आहेत, असे उत्तर दिले. यातून विराटने शास्त्रींनाच पाठींबा असल्याचे अधोरेखित केले. 

कसोटी क्रिकेटमध्ये आम्ही सातव्या स्थानावरून पहिल्या क्रमांकावर धडक मारली. वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी गाठली. संघात दुफळी असती तर एवढी मोठी प्रगती करता आली नसती, असे दाखले देत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने संघातले वातावरण मैत्रीपूर्ण असल्याचा निर्वाळा दिला तर कोणी खेळापेक्षा मोठा नसतो खेळ सर्वश्रेष्ठ असतो असे सांगत संघात सर्व काही अलबेल असल्याचे स्पष्ट केले.
वेस्ट इंडीज दौऱ्यावर प्रयाण करणाच्या पूर्वसंधेला विराट कोहली आणि रवी शास्त्री प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. बीसीसीआयने अगोदर जाहीर केलेल्या कार्यक्रमात शास्त्री उपस्थित रहाणार याचा उल्लेख नव्हता. पण विराटबरोबर शास्त्री आले आणि या दोघांनी संघातील दुफळीबाबतच्या प्रश्नांनावर जोरदार बॅटिंग केली.

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचे उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर वरिष्ठ खेळाडूंमध्ये प्रामुख्याने विराट आणि रोहित शर्मा यांच्यात दुफळी निर्माण झाल्याच्या चर्चांनी शिखर गाठले होते या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद महत्वाची होती. 

चेहरा हाच माझा आरसा
माझा चेहरा बोलका आहे. त्यापासून मी कोणतीही गोष्ट लपवू शकत नाही. मला तांत्रितपणे वागता येत नाही. जर मी कोणाचा तिरस्कार करत असेन ते ते माझ्या चेहऱ्यावर दिसून येते, असे सांगत विराटने संघात कोणाबरोबरही मतभेद नसल्याचा आवर्जून उल्लेख केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli wants Ravi Shastri to continue as India Head Coach