मादाम तुसाँमध्ये आता विराटही

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

नवी दिल्ली - हुबेहूब मेणाचे पुतळे तयार करणाऱ्या नवी दिल्लीतील मादाम तुसाँ संग्रहालयात आता भारतीय कर्णधार विराट कोहलीचाही सन्मान होणार आहे. खेळाच्या विश्‍वात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या सचिन तेंडुलकर, कपिलदेव, लिओनेल मेस्सी यांच्या मेणाच्या पुतळ्याबरोबर विराट कोहलीचाही असाच पुतळा तयार करण्यात येणार आहे. १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा विराट सध्याच्या क्रिकेटचा सुपरस्टार आहे. अर्जुनपासून पद्मश्री अशा पुरस्कारांनीही त्याला गौरवण्यात आलेले आहे. मादाम तुसाँच्या टीमने या पुतळ्यासाठी विराटची २०० हून अधिक मोजमापे घेतली आहेत.

Web Title: virat kohli Wax Statues