World Cup 2019 : पटेल आजींना विराटचे प्रेमळ पत्र! 

वृत्तसंस्था
Saturday, 6 July 2019

वर्ल्ड कप 2019 : लीड्स : बांगलादेशविरुद्धचा सामना पाहायला आलेल्या चारुलता पटेल आजींना विराटने श्रीलंकेविरुद्धच्या लढतीसाठी तिकीटांबरोबरच पत्र सुद्धा पाठविले. "बीसीसीआय'ने ते "ट्‌वीटर हॅंडल'वर पोस्ट केले.

त्यात चारुलताजी यांचा "सुपरफॅन' असा उल्लेख करून विराटने म्हटले आहे की, आमच्या संघाविषयी तुमचे प्रेम आणि निष्ठा प्रेरणादायी आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह खेळाचा आनंद लुटाल अशी मला आशा आहे. तुमच्याविषयी भरपूर आपुलकी वाटते. कळावे, विराट.' या ट्‌वीटमध्ये आधी पटेल आजींचा फोटो आणि हे पत्र पोस्ट करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli writes a letter to Charulata Patel