INDvsWI : अन् व्हिव्ह रिचर्डस मैदानातच कोसळले; थेट रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली. विंडीजचे महान फलंदाज सर व्हिव्ह रिचर्डस यांना मैदानातच भोवळ आली आणि ते कोसळले. त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

किंगस्टन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली. विंडीजचे महान फलंदाज सर व्हिव्ह रिचर्डस यांना मैदानातच भोवळ आली आणि ते कोसळले. त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

Sir Viv Richards, commentary

सामना सुरु होण्यापूर्वी ते समालोचन करण्यासाठी मैदानावर आले मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना स्वयंसेवकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.  

त्यांची प्रकृती अत्यंत उत्तम असून ते दुसऱ्या डावात समालोचन करण्यासाठी पुन्हा दाखल झाले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viv Richards falls ill during pre game of India vs West Indies