वॉझ्नीयाकीची आगेकूच कायम

शुक्रवार, 2 सप्टेंबर 2016

न्यूयॉर्क - डेन्मार्कच्या कॅरोलिन वॉझ्नीयाकीसाठी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा तिसरा दिवस उल्लेखनीय ठरला. तिने माजी विजेत्या आणि नवव्या मानांकित रशियाच्या स्वेतलाना कुझ्नेत्सोवा हिला 6-4, 6-4 असे हरविले. 

कारकिर्दीत एकेकाळी अव्वल स्थानापर्यंत मजल मारल्यानंतर आता वॉझ्नीयाकीची 74व्या क्रमांकापर्यंत घसरण झाली आहे. या स्पर्धेत तिने दोन वेळा अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. या वेळी 0-5 अशा पिछाडीनंतर तिने विजय नोंदविला. गेल्या वर्षी विंबल्डननंतर तिने ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत प्रथमच तिसरी फेरी गाठली. 

महिला एकेरीत संभाव्य विजेत्या जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने आगेकूच केली. तिने क्रोएशियाच्या मिर्याना ल्युचीच-बॅरोनी हिला 6-2, 7-6 (9-7) असे हरविले. आता तिची अमेरिकेच्या कॅथरिन बेल्लीस हिच्याशी लढत होईल. बेल्लीसने देशभगिनी शेल्बी रॉजर्सला 2-6, 6-2, 6-2 असे हरविले. 

मिलॉसची हार 
पाचव्या मानांकित कॅनडाच्या मिलॉस राओनीचला दुसऱ्या फेरीत पराभूत व्हावे लागले. पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या अमेरिकेच्या रायन हॅरिसन याने 6-7 (4-7) 7-5 7-5 6-1 असा विजय मिळविला. हॅरिसन 120व्या स्थानावर आहे. मिलॉसची दमछाक झाली. अंतिम टप्प्यात तो फारशी हालचाल करू शकत नव्हता. मिलॉसने ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या उपांत्य, तर विंबल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे त्याच्याकडून सरस कामगिरीची अपेक्षा होती. 

जोकोविचला पुढे चाल 
अग्रमानांकित नोव्हाक जोकोविचला चेक प्रजासत्ताकाच्या यिरी वेसेली याने पुढे चाल दिली. वेसेलीच्या डाव्या दंडाला सूज आली होती. पहिल्या फेरीत वेसेलीने भारताच्या साकेत मायनेनी याचा कडवा प्रतिकार पाच सेटमध्ये मोडून काढला होता. 

नदालचा धडाका 
स्पेनच्या रॅफेल नदालने इटलीच्या अँड्रीयस सेप्पी याचा 6-0, 7-5, 6-1 असा पराभव करताना धडाकेबाज खेळ केला. आर्थर ऍश स्टेडियमवर सरकते छप्पर बसविण्यात आले आहे. त्यानंतर पहिला सामना खेळण्याचा मान नदालला मिळाला. दुसऱ्या सेटच्या वेळी पाऊस सुरू झाला तेव्हा आठ मिनिटांत खेळ पुन्हा सुरू झाला. छप्पर बंद किंवा उघडे असले तरी परिस्थिती बरीचशी सारखी असते, अशी प्रतिक्रिया नदालने व्यक्त केली. 
 
जागतिक क्रमवारीत "टॉप टेन‘मधील स्थान गमावल्यानंतर मी क्रमवारीकडे पाहणे सोडून दिले. मी "टॉप‘मध्ये स्थान मिळविण्याच्या योग्येतेची आहे असे वाटते. अशा विजयांमुळे आत्मविश्‍वास उंचावतो. 
- कॅरोलिन वॉझ्नीयाकी, डेन्मार्कची टेनिसपटू 

इतर प्रमुख निकाल (दुसरी फेरी) 
महिला एकेरी ः रॉबर्टा व्हिंची (इटली 7) विवि ख्रिस्तीना मॅक्‌हेल (अमेरिका) 6-1, 6-3. डॉमनिका सिब्यूल्कोवा (स्लोव्हाकिया 12) विवि येवगेनीया रॉडीना (रशिया) 6-7 (5-7), 6-2, 6-3. योहाना कॉंटा (ब्रिटन 13) विवि स्वेताना पिरोंकोवा (बल्गेरिया) 6-2, 5-7, 6-2. पेट्रा क्विटोवा (चेक 14) विवि कॅग्ला बुयुकॅकसाय (तुर्कस्तान) 7-6 (7-2), 6-3. 
 
पुरुषएकेरी ः मरिन चिलीच (क्रोएशिया 7) विवि सर्जी स्टॅखोस्की (युक्रेन) 6-1, 6-2, 6-3. गेल मॉंफिस (फ्रान्स 10) विवि यान सॅत्राल (चेक) 7-5, 6-4, 6-3. ज्यो-विल्फ्रीड त्सोंगा (फ्रान्स 9) विवि जेम्स डकवर्थ (ऑस्ट्रेलिया) 6-4, 3-6, 6-3, 6-4.

Web Title: Vozniyaki winning continue

व्हिडीओ गॅलरी