''कुणाचं नाव सुचवू नका, आता आधी कृणालला वन-डेत खेळवा'' 

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त संधी मिळायला हवी अशी इच्छा भारताचा माजी फलंदाज व्ही.व्ही.एस लक्ष्मणने केली आहे.

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त संधी मिळायला हवी अशी इच्छा भारताचा माजी फलंदाज व्ही.व्ही.एस लक्ष्मणने केली आहे.
 
"'कृणाल पांड्या अत्यंत चाणाक्ष आणि हुशार खेळाडू आहे. त्याला त्याची क्षमता चांगलीच माहिती आहे. त्याला एकदविसीय क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त संधी मिळायला हवी. माझ्यामते तो सहाव्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करु शकतो आणि पूर्ण दहा षटकांचा कोटाही पूर्ण करु शकतो,'' अशा शब्दांत त्याने एक इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना कृणालचे कौतुक केले. 

कृणालने वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या ट्वेंटी20 मालिकेत धुमाकूळ घातला. त्यामुळेच त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता. त्याच्या अष्टपैलू खेळाच्या आधारावर भारताने ट्वेंटी20 मालिकेत विंडीजला व्हाईटवॉश दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vvs laxman praises Krunal Pandya and supports him for inclusion in ODI team