हा वैयक्तिक लढा नव्हता - अनुराग ठाकूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

नवी दिल्ली - लोढा समितीच्या शिफारशींवरून हा माझा वैयक्तिक लढा नव्हता. बीसीसीआयची स्वायतत्ता टिकवण्याचा आमचा प्रयत्न होता, अशा शब्दांत बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून दूर व्हावे लागलेल्या अनुराग ठाकूर यांनी मत मांडले.

अनुराग ठाकूर यांच्यासह सचिव अजय शिर्के यांना सर्वोच्च न्यायालयाने पदावरून दूर केल्यानंतर ठाकूर यांनी आपल्या ट्‌विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यातून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘भारतीय क्रिकेटची सेवा करण्याची संधी मला मिळाली. या काळात क्रिकेट प्रशासन आणि क्रिकेटच्या खेळाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. देशातील सर्वोत्तम व्यवस्थापन असलेली ही संघटना ठरली आहे.’

ठाकूर यांनी पुढे म्हटले आहे की, आपल्याकडे सर्वोत्तम क्रिकेट सुविधा आहेत. बीसीसीआयच्या सहकार्याने राज्य संघटनाही चांगले स्टेडियम उभारून त्यांची देखरेख करत आहेत. देशाचा नागरिक म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो.

निवृत्त न्यायाधीशांकडून बीसीसीआयचा कारभार चांगल्या पद्धतीने केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाला वाटत असेल तर मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बीसीसीआय निश्‍चितच चांगला कारभार करेल. भारतीय क्रिकेटच्या प्रगतीचा मी नेहमीच विचार केला आणि या पुढेही करत राहीन, असेही ठाकूर यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.

Web Title: This was not a personal fight